-
युरिक ऍसिड (Uric Acid) हे शरीरातील एक टाकाऊ पदार्थ आहे. किडनी (Kidney) हे युरिक ऍसिड फिल्टर करून लघवीद्वारे शरीराबाहेर टाकते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
शरीरात युरिक ऍसिडचे प्रमाण जास्त होते किंवा किडनी ते योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा रक्तातील त्याची पातळी वाढते.
-
रोजच्या जीवनात पुरेसे पाणी न पिणे (Dehydration) ही एक मोठी सवय आहे.
-
किडनीला युरिक ऍसिड फिल्टर करून लघवीद्वारे बाहेर टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी कमी प्यायल्यास युरिक ऍसिड शरीरात जमा होते.
-
जास्त वेळ बसून राहिल्याने शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) मंदावते आणि वजन वाढते.
-
नियमित व्यायाम न केल्याने वजन वाढते, ज्यामुळे युरिक ऍसिडची पातळी वाढण्याचा धोका वाढतो.
-
जेवणामध्ये खूप मोठे अंतर ठेवल्यास शरीरात तात्पुरता युरिक ऍसिडचे प्रमाण वाढू शकते.
-
सोडा, कोल्ड्रिंक्स, पॅकेज केलेले फळांचे ज्यूस पिणे. फ्रुक्टोजमुळे युरिक ऍसिडचे उत्पादन वाढते.
-
प्रक्रिया केलेले आणि तळलेले पदार्थ जास्त सेवन केल्याने युरिक ऍसिड वाढू शकते.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या… (हेही पाहा : Pregnancy Health Tips: गरोदर माहिलांनी ‘ही’ आठ फळं ठरतील रामबाण, बाळ होईल सुदृढ)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार