-
स्तनाचा कर्करोग फक्त महिलांनाच होत नाही, तर… अनेकांना वाटतं की स्तनाचा कर्करोग फक्त महिलांनाच होतो; पण पुरुषांनाही हा आजार होऊ शकतो. फक्त पुरुषांच्या शरीरात स्तन ऊतकं थोड्या प्रमाणात (breast tissue) असतात; पण त्यामुळे त्यांनाही हा धोका संभवतो.
-
पुरुषांमध्ये हा आजार दुर्मीळ: संपूर्ण स्तनाच्या कर्करोगाच्या प्रकरणांपैकी फक्त १% रुग्ण पुरुष असतात. त्यामुळे याबाबत जागरूकता कमी असल्याने निदानही उशिरा होते.
-
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका : पुरुषांमध्ये छातीवर गाठ दिसणे, स्तनाग्रातून स्राव येणे, वेदना किंवा सूज येणे ही काही प्रारंभिक लक्षणे असू शकतात. अशा बदलांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
-
कारणांमध्ये हार्मोन्स आणि आनुवंशिकता : इस्टोजेन हार्मोनचे जास्त प्रमाण, जास्त वजन, लिव्हरचे आजार आणि BRCA1/BRCA2 जीन म्युटेशन ही काही प्रमुख कारणे मानली जातात.
-
वय वाढल्यास धोका वाढतो : ५० वर्षांपुढील पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. तथापि, तरुण पुरुषांनाही तो होऊ शकतो.
-
निदानासाठी तपासण्या आवश्यक: मॅमोग्राफी, बायोप्सी आणि अल्ट्रासाऊंडच्या मदतीने डॉक्टर अचूक निदान करू शकतात. लवकर तपासणी केल्यास उपचार सोपे आणि प्रभावी ठरतात.
-
उपचार महिलांसारखेच: पुरुषांमध्येही शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन व हार्मोन थेरपी या उपचार पद्धती वापरल्या जातात.
-
लवकर निदान होणे महत्त्वाचे : लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार केल्यास बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
-
जागरूकता आणि शिक्षण गरजेचे : पुरुषांमध्ये या आजाराबाबत अजूनही सामाजिक संकोच आणि अज्ञान आहे. त्यामुळे याबाबत खुली चर्चा आणि जागरूकता मोहिमा अत्यंत आवश्यक आहेत. (सर्व फोटो सौजन्य :पेक्सेल्स)

पैसा, पैसा आणि फक्त पैसा… २०२६ पर्यंत राहू देणार ‘या’ तीन राशींच्या भाग्याची साथ; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार