-  
  गाजराचा रस – आरोग्याचा खजिना गाजरात बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन ए, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे डोळ्यांचे आरोग्य सुधारते, त्वचेला नैसर्गिक तेज देते आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 -  
  हृदयासाठी उपयुक्त पेय अभ्यासानुसार, गाजराचा रस शरीरातील अँटिऑक्सिडंट्स वाढवतो आणि रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवतो, त्यामुळे हृदय मजबूत राहते आणि शरीर ताजेतवाने वाटते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 -  
  लिंबू – शरीर शुद्ध ठेवणारा घटक गाजराच्या रसात काही थेंब लिंबाचा रस टाकल्याने रस अधिक ताजातवाना आणि पौष्टिक होतो. लिंबातील व्हिटॅमिन C शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकते आणि यकृत स्वच्छ ठेवते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 -  
  आलं – पचन आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर थोडंसं ताजं आलं रसाला मसालेदार चव देतं. ते पचन सुधारतं, सूज कमी करतं आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवतं. थंड हवामानात आलं शरीराला उष्णता देते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 -  
  संत्र – चमकदार त्वचेसाठी उत्तम संत्र्यातील व्हिटॅमिन C त्वचेला उजळपणा देतं आणि शरीरातील सूज कमी करतं. संत्र मिसळलेला गाजराचा रस पिण्याने शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा टिकून राहतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 -  
  सफरचंद – गोडवा आणि फायबर दोन्ही गाजराच्या रसात सफरचंद घातल्याने रसाचा गोडवा आणि पोषणमूल्य दोन्ही वाढतात. सफरचंदातील फायबर पचन सुधारतं आणि शरीर डिटॉक्स करण्यात मदत करतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 -  
  सुंदर त्वचा आणि चमकदार आरोग्य या सर्व घटकांच्या मिश्रणामुळे त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं, चेहऱ्यावरील थकवा कमी होतो आणि शरीराला आतून स्वच्छता व ऊर्जा मिळते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 -  
  दररोज सकाळची आरोग्यवर्धक सवय ताज्या गाजरात लिंबू, आलं, संत्र आणि सफरचंद मिसळून तयार केलेला रस दररोज सकाळी प्या. हे नैसर्गिक पेय तुमचं आरोग्य, सौंदर्य आणि मन प्रसन्न ठेवेल. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 -  
  (टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
 
  हाडांचा कमकुवतपणा घालवण्यासाठी ‘हा’ पाला आहे रामबाण इलाज… सांधेदुखीवरही ठरेल फायदेशीर