-
भारतीय इतिहासातील महान तत्त्वज्ञ, रणनीतीकार व विचारवंत आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवातून शहाणपणाच्या अनेक अमूल्य गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांची ‘चाणक्य नीती’ आजही जीवनात योग्य निर्णय घेणे आणि कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी प्रेरणादायी ठरते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
चुकीच्या संगतीचा होतो अनर्थ चाणक्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, काही लोकांचा सहवास हे जगणया्साठी अत्यंत हानिकारक आणि मानसिक त्रासदायक ठरतो. अशा लोकांच्या संपर्कात राहिल्यास जीवन हळूहळू दुःख, तणाव आणि अस्वस्थतेने भरते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
दुष्ट स्वभावाची पत्नी म्हणजे दुःखाचे मूळ चाणक्य नीतीत नमूद केले आहे की, जर पत्नी सतत भांडण करणारी, पतीचा व कुटुंबाचा अपमान करणारी असेल, तर त्या घरात कधीच शांती राहू शकत नाही. अशा वातावरणात मानसिक ताण वाढतो आणि आयुष्यातील आनंद हरवतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
घरातील शांततेवर होतो परिणाम ज्या घरात सतत कलह, गैरसमज व वाद निर्माण होतात, त्या घरात शांती टिकत नाही. चाणक्य म्हणतात की, अशी परिस्थिती जीवनात दुःखाचे सावट निर्माण करते आणि व्यक्तीचा आत्मविश्वासही ढासळतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
खोटारडा किंवा कपटी मित्र म्हणजे संकट चाणक्यांच्या मते, जो मित्र गरजेच्या वेळी गायब होतो किंवा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी साथ देतो, तो खऱ्या शत्रूपेक्षा धोकादायक असतो. असा मित्र माणसाचे मनोबल कमी करतो आणि मानसिक अस्थिरता वाढवतो. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
फसव्या मित्रामुळे वाढता एकाकीपणा व दुःख यांचा सामना करावा लागतो. अशा संबंधांमुळे मनाची शांती हरवते आणि जीवनात निराशेचे वातावरण तयार होते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
बंडखोर नोकर म्हणजे घरातील संकट जर एखाद्या घरातील नोकर कामात दुर्लक्ष करणारा, मालकाचा अपमान करणारा किंवा सतत वाद घालणारा असेल, तर ते घर कधीच सुखी राहू शकत नाही. चाणक्य सांगतात की, असे लोक आपल्या मालकासाठी संकट बनतात. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
जबाबदारीशून्य वर्तनामुळे वाढते अस्थिरता बंडखोर नोकर घरातील शिस्त बिघडवतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण करतात. त्यामुळे घरातील सौहार्दता आणि स्थैर्य दोन्ही नष्ट होते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
-
शांतीसाठी योग्य संगतीची गरज जीवनात आनंद आणि समाधान टिकवायचे असेल, तर चांगल्या लोकांचा सहवास आवश्यक आहे. चाणक्य सांगतात की, विवेकी, प्रामाणिक आणि सकारात्मक लोकांसोबत राहिल्यास जीवनात सुख आणि शांती आपोआप येते. (फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
राहुल गांधींच्या खळबळजनक दाव्यांवर निवडणूक आयोगाचं उत्तर; म्हणाले, “तुमचे एजंट्स…”