-
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे आज नव्या हातामध्ये गेली. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणूकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची निवड झाली आहे. पक्षाने दिल्लीमधील कार्यालयामध्ये तशी औपचारिक घोषणाही केली आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजपाध्यक्ष असा प्रवास करणारे जे.पी. नड्डा नक्की आहेत तरी कोण आणि त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…
-
जे.पी. नड्डा यांची १७ जून २०१९ रोजी भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मिळालेल्या विजयामध्ये नड्डा यांचे मोलाचे योगदान होतं. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेल्या यशातही त्यांनी मोठं योगदान दिलं आहे.
-
जे.पी. नड्डा म्हणजेच जगत प्रकाश नड्डा यांचा जन्म पाटणा या ठिकाणी एका ब्राह्मण कुटुंबात झाला.
-
पाटणा येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातून नड्डा यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिमाचल प्रदेशातून त्यांनी एलएलबीची डिग्री घेतली.
-
विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही नड्डा यांनी सहभाग नोंदवला होता. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले.
-
१९८४ मध्ये स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा पराभव अभाविपने केला होता. ज्यानंतर हिमाचल प्रदेशात पहिल्यांदा विद्यार्थी युनियनचे अध्यक्षपद जे. पी नड्डा यांनी भुषवलं.
-
१९८६ पासून नड्डा राजकारणामध्ये सक्रिय आहेत. सुरुवातीला अभाविपचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
-
१९८६ ते १९८९ या कालावधीत जे. पी. नड्डा हे अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते. त्यानंतर भारतीय युवा मोर्चा अर्थात भाजयुमोच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली.
-
वयाच्या ३३ व्या वर्षी नड्डा यांनी हिमाचलमधून आमदारकीची निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले.
-
त्यानंतर नड्डा यांनी १९९८ आणि २००७ या वर्षीही आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली.
-
राज्यातील या यशस्वी राजकीय प्रवासानंतर नितीन गडकरी यांच्यामुळे जे. पी. नड्डा यांचा प्रवेश भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात झाला. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसभा लढवली. त्यानंतर ते अमित शाह यांचे विश्वासू सहकारी झाले.
-
जे. पी नड्डा यांना अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखलं जाते. अमित शाह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
-
जे.पी. नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवकही आहेत.
-
जे. पी. नड्डा यांचा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्रिमंडळात समावेश होता. कमीत कमी प्रकाशझोतात राहून वेगाने कामं करून घेण्याचं कौशल्य नड्डा यांच्यात आहे.
-
आयुष्मान भारत, मोदी केअर या योजना लागू करण्यात नड्डा यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
-
उत्तर प्रदेशात मतांची टक्केवारी ५० टक्के यावी अशी अपेक्षा अमित शाह यांनी नड्डा यांच्याकडून केली होती. नड्डा यांनी ४९.६ टक्के टक्केवारी आणून दाखवली.
-
नितीन गडकरी यांच्यामुळे जे. पी. नड्डा यांचा प्रवेश भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात झाला.
-
केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात जूनमध्येच पत्र लिहिलं होतं. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यात यावी, अशी विनंती शाह यांनी केली होती. त्यानुसार ही नवीन नियुक्ती केली जाणार आहे.

Ajit Pawar: अजित पवार आणि अंजना कृष्णा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “खूप वेळा…”