केरळमध्ये जातीय सलोख्याचं एक अनोखं उदाहरण पहायला मिळालं अलपुझा जिल्ह्यामधील कायमकुलम येथील मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत एकतेचा संदेश दिला. इतकंच नाही तर हे लग्न १०० वर्ष जुन्या चेरावल्ली जमात मशिदीत लावण्यात आलं. अगदी हिंदू धर्माच्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. हे लग्न सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विवाह झालेल्या तरुणीचं नाव अंजू आहे. अंजूच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर असहाय्य झालेल्या बिंदू आपल्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहतात. आई बिंदू यांच्यासमोर मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता लागली होती. त्यांनी मशिदीच्या व्यवस्थानकडे यासाठी मदत मागितली. यावर त्यांनी तात्काळ मदतीसाठी तयारी दर्शवली. -
लग्नासाठी १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला.
विशेष म्हणजे मशिदीकडून पाहुण्यांच्या जेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. यासोबत नवदांपत्याला दहा तोळे सोने आणि दोन लाख रुपये भेट म्हणून देण्यात आले. -
लग्नासाठी जवळपास एक हजार पाहुणे हजर होते

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ