-
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा घेतली, म्हणजे राज्य वा केंद्र पातळीवर ‘सरकारप्रमुख’ म्हणून मोदी हे आज विसाव्या वर्षांत पदार्पण करत आहेत.
-
७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा शपथ घेतली. तेव्हापासून आजतागायत, सरकारप्रमुख या नात्याने त्यांनी एकाही निवडणुकीत पराभव न पाहता, पंतप्रधानपदाच्या राष्ट्रीय जबाबदारीची भूमिका स्वीकारली आहे.
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या मोदींच्या हाती मुख्यमंत्री गुजरातची सेवा करण्याची संधी देण्यात आली. मोदींनी आपल्या कार्यकाळात गुजरातमध्येही भाजपाला उत्तम स्थान मिळवून दिलं.
-
राष्ट्रीय निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम ज्या प्रमाणे आपण यशस्वी करतो, त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांनी लस व्यवस्थापन आणि वितरण यशस्वी करावे असे मोदी म्हणाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा दुसरा कार्यकाळ आहे. त्यांचा पहिला कार्यकाळ २०१९ मध्ये पूर्ण झाला.
-
-
आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरूवातीला त्यांनी तिहेरी तलाकपासून मुस्लीम समाजातील महिलांना मुक्ती दिली. ही मुस्लीम समाजातील मोठी सुधारणा असल्याचं भाजपाचं मत आहे.
-
आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरूवात, करोना महामारीची झळ सोसत असलेल्यांना मोफत धान्य यापासून ते एलएसीवर चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देणं आणि कृषी क्षेत्रातील अनेक सुधारणा अशी अनेक महत्त्वाची पावलं मोदींना आपल्या कार्यकाळात उचलली.
-
७ ऑक्टोबर २००१ रोजी मोदींनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच भूजमधील भूकंपानं गुजरात हादरलं होतं.
-
व्हायब्रंट गुजरात सारख्या काही निर्णयांमुळे गुजरातला पुन्हा उभं राहण्यास मदत मिळाली.
-
यानंतर गुजरात वीजेच्या उत्पादनासह अन्य बाबींमध्येही आत्मनिर्भर झाला. तसंच यानंतर गुजरातचं विकासाचं मॉडेल चर्चेत आलं.
-
२०१३ मध्ये भाजपानं मोदींना आपल्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराच्या रूपात समोर आणलं. त्यांनी यादरम्यान काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत बहुमतासह सत्ता मिळवली होती.
-
गुजरातच्या आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवरील त्यांची शासकता ही कार्यक्षम आहे, परिणामकारक आहे आणि सुधारणावादीसुद्धा असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा म्हणाले.
-
या शासकतेबद्दल कितीही बोलावं, बोलतच राहावं आणि थांबूच नये अशी स्थिती असली तरीही, २००१ मधील गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्तीपासून ते आजपर्यंतच्या नरेंद्र मोदी यांच्या वाटचालीचं साजरेपण हे आणखी निराळ्याच कारणामुळं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
-
नरेंद्र मोदी हे शासकता आणि राजकारण यांच्या पापुद्रय़ांच्या पलीकडे असलेल्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करतात. भारत आणि भारतीय यांमधील जे जे उत्तम, त्याला आवाहन करतात आणि उत्कृष्ट परिणामदेखील मिळवून दाखवतात, असंही नड्डा म्हणाले.

ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…