-
उत्तर प्रदेशमधील आग्र्यातील एका रस्त्याच्या बाजूच्या फुटपाथवर चविष्ठ अन्नपदार्थ विकून पोट भरणारी रोटीवाली अम्मा सध्या खूपच चिंतेत आहे. (सर्व फोटो: एएनआयवरुन साभार)
-
रोटीवाली अम्मा नावाने लोकप्रिय असणाऱ्या भगवान देवी यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांच्या दोन्ही पोरांनी त्यांचा संभाळ करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर वृद्धापकाळात कष्ट करुन पोट भरण्याची वेळ आली आहे. मात्र मागील सात महिन्यांपासून लॉकडाउनमुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याने अम्मांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.
-
दिल्लीतील बाबा का ढाबातील वृद्ध जोडप्याप्रमाणे या अम्मांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र त्यांना याचा फारसा फायदा झालेला नाही. केवळ २० रुपयांमध्ये अम्मांकडे डाळ, भाजी, पोळी आणि भात असे पदार्थांचे ताट मिळते. या थाळीच्या विक्रीतूनच अम्मा स्वत:चा उदर्निवाह चालवतात.
-
अम्मा मागील १४ ते १५ वर्षांपासून हे काम करत आहे. खास करून मजूर आणि रिक्षा चालक हे अम्माचे मुख्य ग्राहक आहेत. मात्र लॉकडाउनमध्ये बांधकाम आणि सार्वजनिक प्रवासावर बंदी असल्याने ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे अम्मा सांगतात.
-
केवळ लॉकडाउनमुळे आलेलेच संकट नाही तर आता शहर प्रशासनाने फुटपाथवरील त्यांच्या दुकानावरही कारवाई केल्याने अडचणी वाढल्या आहेत. मला कोणीच पाठिंबा देत नाहीय. मला अनेकदा वेगवेगळ्या जागी स्वत:चा हा संसार घेऊन फिरावं लागत आहे. मी कुठे जाऊ, कोणाची मदत घेऊ मला काहीच कळत नाही. मला एखादे छोटे दुकान मिळालं असतं तर तिथेच मी माझा व्यवसाय केला असता असं अम्मांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

‘या’ दोन हेल्थ इन्शुरन्सची Cashless Treatment सुविधा १ सप्टेंबरपासून बंद; लाखो रुग्णांना बसणार फटका