-
आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्री केलं नसतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. कळसूत्री बाहुली ही किमान तालावर तरी नाचते उद्धव ठाकरेंना नाचताही येत नाही. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
-
दुसऱ्याच्या मदतीशिवाय उद्धव ठाकरे यांना काहीही करता येत नाही. मी लहानपणापासून त्यांना ओळखतो. अत्यंत पुळचट आणि शेळपट माणूस आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
-
सुशांतची आत्महत्या नाही, तर तो खूनच आहे. खूनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात एक मंत्रीही असेल आणि तो यांचा मुलगा असेल,” अशा शब्दांत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
“आमचा तोल गेला तर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढू आणि नंतर ते महागात पडेल. आमच्याकडे नजर फिरवु नका, नाही तर कपडे संभाळताना पळताभुई थोडी होईल” अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे कुठलाही ताळमेळ नसलेली निर्बुद्ध, शिवराळ बडबड होती. असं भाषण यापूर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं अशा शब्दात भाजपाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.
-
मोदींच्या नावावर आणि आशीर्वादानेच शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. नाहीतर यांच्या स्वतःच्या नावावर आणि कर्तुत्वावर २५ आमदारही निवडून आले नसते, अशी टीका भाजपा नेते नारायण राणे यांनी केली. ( एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर)
-
“देशाच्या पंतप्रधानांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या धोरणांबद्दल बोलण्याची या मुख्यमंत्र्यांची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्र पहावा, महाराष्ट्र सांभाळावा, राज्यातील अडचणी आणि करोनाचे मृत्यू कमी कसे होतील याकडे लक्ष द्यावं" असे राणे म्हणाले.
-
उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली, हिंदुत्व सोडलं आणि सेक्युलर पार्टीसोबत गेले आणि काल सांगतात आम्ही आजही हिंदू आहोत, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. हे तुम्हाला आज कळलं का? असा सवाल राणेंनी केला.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”