-
नुकत्याच केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे निकाल समोर आले. या निवडणुकीमध्ये २१ वर्षीय आर्या राजेंद्रन या तरुणीनेही विजय मिळवला आहे.
-
मात्र आर्या एवढ्यावर थांबली नसून लवकरच ती राष्ट्रीय स्तरावरील विक्रम नोंदवणार आहे.
-
केरळची राजधानी असणाऱ्या तिरुअनंतपुरमच्या महापौरपदी लवकरच आर्या विराजमान होणार आहे.
-
आर्या तिरुअनंतपुरमची महापौर झाल्यानंतर ती देशातील सर्वात तरुण महापौर ठरेल.
-
आर्याने महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुडावनमुगल येथून निवडून आली आहे.
-
आर्याने यूडीएफच्या उमेदवार श्रीकला यांना दोन हजार ८७२ मतांनी हरवलं. आर्या ही २०२० च्या या निवडणुकीमधील सर्वात तरुण उमेदवारही ठरलीय हे विशेष.
-
आर्याचं नाव महापौर पदासाठी सुचवण्याचा निर्णय सीपीएमच्या जिल्हा सचिवालयातील एका पॅनेलने घेतला आहे.
-
राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आधीपासूनच डाव्यांची सत्ता आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्येही एलडीएफने विजय मिळवला आहे.
-
एकीकडे आर्याने विजय मिळवला असला तरी तिच्या एलडीएफ पक्षाला दोन मोठे धक्केही बसलेत. एलडीएफचे महापौर पदाचे उमेदवार आणि सध्याचे महापौर पराभूत झालेत.
-
शहरातील पेरुरकडा वॉर्डचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जमीला श्रीधरन यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या ठिकाणी आर्याची वर्णी लागणार आहे.
-
आर्या ही केरळची राजधानी असणाऱ्या तिरुअनंतपुरममधील के. ऑल सेंट्स कॉलेजमध्ये शिकते. आर्या सध्या बीएससी मॅथमॅटिक्सच्या दुसऱ्या वर्षाला आहे.
-
कॉलेजच्या वयापासूनच आर्या येथील स्थानिक राजकारणामध्ये खूप सक्रीय सहभाग घेत आहे.
-
सध्या आर्या स्टुडंट फेड्रेशन ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय समितीची सदस्य आहे. तसेच ती बालसंगमच्या केरळमधील युनिटची अध्यक्ष आहे. बालसंगम हा सीपीएमच्या तरुणांचा गट आहे.
-
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आर्याने आपण विजयी झाल्यास सर्वात आधी आपण जी विकासकाम हाती घेणार आहोत त्यामध्ये खालच्या स्तरातील प्राथमिक शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी काम करणार असल्याचं म्हटलं होतं.
-
प्रचारादरम्यान आर्या तरुणाईमध्ये बरीच लोकप्रिय असल्याचे दिसून आलं. अनेक ठिकाणी तिला तिच्या समर्थकांनी अशाप्रकारच्या भेटवस्तू दिल्याचे पहायला मिळालं.
-
पक्ष आपल्याला जी कोणती जबाबदारी देईल ती पार पाडण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करु अस आर्याने शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.
-
आपला शैक्षणिक प्रवास आणि राजकारण दोन्ही एकाच वेळी सुरु राहील असा विश्वास आर्याने व्यक्त केला आहे.
-
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये डाव्या लोकशाही आघाडीने सहा महानगपालिकांपैकी पाच महानगरपालिकांमध्ये विजय मिळवला आहे.
-
सध्या सोशल नेटवर्किंगवर आर्याच्या नावाची चांगलीच चर्चा असून तिला पुढील वाटचालीसाठी तिचे अनेक हितचिंतक शुभेच्छा देताना दिसत आहेत.
-
आर्या सर्वात तरुण महापौर होणार ही बातमी समोर आल्यानंतर तिचे अनेक जुने नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. (सर्व फोटो : Facebook/saryarajendran तसेच Twitter/Advaidism आणि ट्विटवरुन साभार)

Ahmedabad Plane Crash : मोठी बातमी : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जात होतं