-
आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. सर्व समान्यांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेलं आहे. बजेटमधील अनेक घोषणांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सर्वसामान्यांवर परिणाम होणार आहे. मात्र त्याचबरोबर आजपासून म्हणजेच एक फेब्रुवारीपासून काही महत्वाचे बदल सर्वसामान्यांच्या खिशाला खड्डा पाडण्याचं तसेच काही बाबातीत सूट देण्याचं काम करणार आहेत. जाणून घेऊयात याचबद्दल…
-
आजपासून गॅसचे दर बदलणार – दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीमध्ये तसेच व्यवसायिक स्तरावरील गॅस वापराचे दर बदलतात.
-
आजही गॅसचे नवीन दर जाहीर होणार आहेत. जानेवारी महिन्यामध्ये गॅसदरांमध्ये काही बदल करण्यात आले नव्हते. मात्र डिसेंबरपासून दोन वेळा गॅसचे दर वाढल्याने यंदाही हे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
-
या एटीएममधून रोख रक्कम काढता येणार नाही – पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाचा बदल आजपासून होणार आहे. पंजाब नॅशनल बँकने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. एटीएम फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेत बँकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
-
आजपासून पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना ईएमव्ही नसणाऱ्या एटीएम मशीन्समधून पैसे काढता येणार नाहीत. ईएमव्ही नसणाऱ्या एटीएम मशीन्स या कार्डवरील डेटा मॅग्नेटीक स्ट्रीपच्या मदतीने वापरतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या एटीएम मशीनमध्ये व्यवहार सुरु असतानाच कार्ड आतमध्ये न राहता डेटा वाचून बाहेर येत ंअशा मशीनमधून आजपासून पीएनबीच्या ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत.
-
आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात – एअर इंडिया एक्सप्रेसने आजपासून अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर उड्डाणांची घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्सप्रेस फेब्रुवारी महिन्यापासून २७ मार्चपर्यंत त्रिची आणि सिंगापूरदरम्यान रोज उड्डाण घेणार आहे.
-
एअर इंडिया एक्सप्रेस कुवैत विजयवाडा, हैदराबाद, मंगळूरु, त्रिची, कोझिकोड, कुन्नूर आणि कोच्चीसारख्या ठिकाणांहून विमानसेवा परुवणार आहे. यापूर्वीच कंपनीने अनेक देशांतर्गत विमान उड्डाणांची घोषणा केली असून जानेवारीपासून या सेवा सुरु झाल्या आहेत.
-
या वस्तूंच्या किंमती कमी होणार – एक फेब्रुवारी २०२१ रोजी मोदी सरकार देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. सरकार या अर्थसंकल्पामध्ये वस्तूंवर आकारण्यात येणारे सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी कमी करणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये फर्निचरसाठी लागणारा कच्चा माल, तांब्याच्या भंगारातील वस्तू, काही रसायने, दूरसंचार क्षेत्राशीसंबंधित उपकरणे, रबर उत्पादने, पॉलिश हिरे, रबराचे सामान, चामड्यापासून बनवलेले कपडे, कार्पेट यासारख्या २० हून अधिक वस्तू स्वस्त होण्याचा अंदाज आहे.
-
याचबरोबरच फर्नीचर बनवण्यासाठी वापरण्यात येणारं लाकूड आणि हार्डबोर्डवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे फर्नीचरसंदंर्भातील अनेक गोष्टी स्वस्त होण्याची अपेक्षा आहे.
-
पीएमसी बँकेसाठी मागवेल प्रस्ताव – आर्थिक घोटाळ्यामुळे वादात सापडलेल्या पीएमसी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाने बँकेला पुन्हा नव्या जोमाने उभं करण्यासाठी गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील गुंतवणुकीचे प्रस्ताव एक फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आवाहन केलं आहे.
-
काही गुंतवणुकदारांनी सेंट्रम ग्रुप भारतपीसोबत मिळून बँकेला आधीच प्रस्ताव दिला आहे. त्याबरोबर युनायटेड किंग्डममधील लिबर्टी ग्रुपनेही कंपनीला एक मोठा प्रस्ताव दिला आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य: पीटीआय, रॉयटर्स आणि एएफपी)

रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीजवळ सिंह आला अन् वास घेत पुढे केलं असं काही की…; VIDEO पाहून भरेल धडकी