-
यंदा मुसळधार पावसाने मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढलंय.
-
अनेक ठिकाणी पूर येऊन ऐन हातातोंडाशी आलेलं पिक हिरावून नेलंय.
-
अगदी भरवशाचं पिक असलेला ऊसही अनेक दिवस पाण्यात राहिल्यानं खराब होत आहे.
-
याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दौरा करत पीडित शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले.
-
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी “साहेब! काहीही करा, पण आमची दिवाळी गोड करा” अशी आर्त स्वरातील मागणी केली.
-
शेतकऱ्यांचे काळीज चिरणारे आवाज ऐकून अनेकजण स्तब्ध झाले.
-
शेतकऱ्यांच्या व्यथा मनाला सुन्न करणारे असल्याचं मत देवेंद्र फडणवीसांनी माडलंय.
-
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील नुकसान दाखवायचे असेल तेव्हा ५०० रुपये द्या, अशी मागणी होत असल्याची तक्रार उपस्थितांनी केलीय.
-
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांपैकी अनेकांनी आपली व्यथा मांडली.
-
तसेच शेतकऱ्यांच्या वतीने फडणवीसांना आपल्या मागण्याचं पत्रही देण्यात आलं.

Russian Woman in Forest : दोन मुलींसह गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने जंगलात ८ वर्षे कशी घालवली? चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती