-
आर्यन खान प्रकरणात एकापाठोपाठ एक नवे आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिकांवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या मुलाचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
-
१९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळलेल्या अंडरवर्ल्डच्या लोकांकडून नवाब मलिकांनी जमीन खरेदी केल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
-
नवाब मलिक यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली, असा सवालही फडणवीसांनी केला आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दोन नावे दिली आहेत. त्यात सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम पटेल यांचा उल्लेख आहे. (फोटो सौजन्य- @Devendra_Office/ट्विटर)
-
सरदार शाह वली खान १९९३च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे, ज्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो टायगर मेमनचा साथीदार होता, तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा याचा मागोवा घेत होता. त्याने टायगर मेमनच्या वाहनात आरडीएक्स भरले होते. (Express Archive)
-
दुसरी व्यक्ती मोहम्मद सलीम पटेल आहे, जो दाऊद इब्राहिमचा माणूस होता. फडणवीस यांनी तो हसीना पारकरचा चालक, अंगरक्षक होता असे म्हटले.(फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
२००७ मध्ये हसिना पारकरला अटक झाली तेव्हा सलीम पटेललाही अटक करण्यात आली होती. दाऊदच्या पलायनानंतर हसीनाच्या नावावर संपत्ती जमा झाल्याचे रेकॉर्डवरून समोर आले आहे. यात सलीमची महत्त्वाची भूमिका होती. मालमत्तेची पॉवर ऑफ अॅटर्नी त्यांच्या नावावर घेण्यात आली. सलीम पटेल हसीनाच्या संपूर्ण व्यवसायाचा प्रमुख होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी २००५ मध्ये दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकरचा ‘फ्रंट मॅन’ मोहम्मद सलीम पटेल आणि १९९३च्या बॉम्बस्फोटाचा दोषी शाहवली खान यांच्याकडून २.८० एकरचा भूखंड खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आह
-
१९३३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवलेल्या अंडरवर्ल्डमधील या लोकांशी नवाब मलिक यांनी व्यवहार केला होता असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. (फोटो सौजन्य- @Devendra_Office/ट्विटर)
-
नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन खरेदी केली होती. टाडा कायद्यांतर्गत मुख्य जमीन जप्त होऊ नये म्हणून हा करार करण्यात आला आहे का, असा सवाल फडणवीसांनी केला. (फोटो सौजन्य- @Devendra_Office/ट्विटर)
-
कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील मुख्य जमीन २० लाख या नाममात्र रकमेला विकत घेण्यात आली होती, तर २००५ मध्ये त्या जमिनीचा बाजार भाव २,०५३ प्रति चौरस फूट होता. मलिक हे आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री असताना हा करार झाला होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. (फोटो सौजन्य- @Devendra_Office/ट्विटर)
-
मुंबईतील गुन्हेगारांकडून जमीन का खरेदी केली? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. अशा एकूण पाच मालमत्ता आहेत, त्यापैकी चार मालमत्तांमध्ये १०० टक्के अंडरवर्ल्डची भूमिका होती.
-
हे सर्व पुरावे राष्ट्रवादीचे शरद पवार आणि सक्षम विभागाला दिले जातील असेही फडणवीस यांनी म्हटले.
-
त्यानंतर उद्या सकाळी १० वाजता फडणवीसांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
-
देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले होते पण मी आता हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’