-
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपा मध्ये येऊन आपलं आयुष्य सुखकर करावे अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
-
ठाण्यात मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केले आहे.
-
रामदास कदमांना त्यावेळी नारायण राणेंविरुद्ध बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते पद दिले होते. आज काय अवस्था केली आहे त्यांची असा सवाल नितेश राणेंनी केला.
-
उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब नाहीत. बाळासाहेब वेगळे होते, असेही नितेश राणेंनी म्हटले आहे.
-
आज जे आमच्या विरुद्ध आणि भाजपा विरुद्ध बोलणारे लोक आहेत त्यांनी रामदास कदमांकडून बोध घ्यावा नाहीतर त्यांच्यासारखी इतर शिवसेना नेत्यांची अवस्था होईल
-
उद्धव ठाकरेंचे जग त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आहे. विधान परिषदेसाठी जागाही वरळीमध्ये दिली असे नितेश राणे म्हणाले
-
म्हणून एकनाथ शिंदेंनी वाट पाहू नये अशी त्यांना मी विनंती करतो असे नितेश राणे म्हणाले.
-
एकनाथ शिंदे फार चांगले काम करत आहेत. श्रीकांत शिंदेचेही वय वाढत आहे त्यांनाही आमच्या बाजूला बसवा असे नितेश राणे म्हणाले.
-
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या चौकटीत तयार झालेले ते कडवट शिवसैनिक आहेत.
-
आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या पदावर बसायला पाहिजे होते. पण त्यांना दोन वर्षापासून थांबवून ठेवले आहे, असे नितेश राणे म्हणाले.
-
पुढे मुख्यमंत्री बदलायची वेळ आली तर आदित्य ठाकरेंशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार केला जाणार नाही असे नितेश राणे म्हणाले. -
म्हणून एकनाथ शिंदेंनी भाजपामध्ये येऊन आयुष्य सुखकर करुन टाकावे असा सल्ला नितेश राणेंनी दिला आहे.
-
यावेळी महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
-
ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत, असे नितेश राणे म्हणाले.
-
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते, असेही नितेश राणेंनी म्हटले.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक