-
मशिदींवरील भोग्यांवरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. शनिवारी हनुमान जयंतीला हनुमान चालिसा पठण करत राज ठाकरेंनी एकाप्रकारे भोंग्याविरोधी आंदोलनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दोन महत्वाच्या घोषणा केल्या. फक्त साडे सात मिनिटात राज ठाकरेंनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
-
“मला दोन घोषणा करायच्या होत्या. ते बोलले की आम्ही बोलायचं तेव्हा आम्ही बोलायचं हे काही योग्य नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी बोलेन,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
-
“लोकांना भोंग्याचा धार्मिक विषय आहे असं वाटत आहे, पण हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहण्याची गरज आहे,” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
-
“फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्ष हा प्रलंबित राहिलेला विषय आहे. तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असाल तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
-
“देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा,” असं आवाहन यावेळी राज ठाकरेंनी केलं.
-
सध्या रमजान सुरु असल्याने काही सांगायचं नाही आहे. पण ३ तारखेपर्यंत यांना समजलं नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे,” असा इशारा राज ठाकरेंनी यावेळी दिला.
-
“मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरु आहे. महाराष्ट्रात आणि देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोत. कोणत्याही हाणामारी नको आहे. शांतता भंग करण्याची इच्छाही नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
“माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. पण जर लाऊडस्पीकरवर लावणार असतील तर आमच्याही आरत्या त्यांना ऐकाव्या लागतील,” असं राज ठाकरे म्हणाले.
-
मनसे कार्यकर्त्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर काढले जात नसतील तर आमच्या मुलांनी केलेल्या अनधिकृत कसं मानता? अशी विचारणा केली.
-
सुप्रीम कोर्टाने शांतताभंग करणाऱ्या लाऊडस्पीकरला परमिट देऊ नका असं सांगितलं आहे अशी आठवण राज ठाकरेंनी करुन दिली.
-
आपण स्वत: काही गोष्टी समजून घेणार आहोत की नाही? मुस्लीम समाजालाही या गोष्टी समजल्या पाहिजेत. देशापेक्षा यांचा धर्म मोठा होऊ शकत नाही. लोकांना या गोष्टीचा त्रास होत आहे याची कल्पना त्यांना येणं आवश्यक आहे असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
-
आमचे हात काय बांधले आहेत का? अशी विचारणा यावेळी राज ठाकरेंनी इशारा देणाऱ्यांना दिला.
-
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता राज ठाकरे यांनी आपण अशा लवंडयांबद्दल फार काही बोलत नाही असं सांगत जास्त भाष्य करण्यास नकार दिला.
-
“आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका,” असा इशारा राज ठाकरेंनी दिल्लीतील हिंसाचारावर बोलताना दिला.
-
राज ठाकरेंनी यावेळी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी संभाजीनगरमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं आणि ५ जूनला सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली. (एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
दरम्यान राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी पुण्यातील सदाशिव पेठेतील खालकर तालीम चौक येथील हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. (एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. (एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
मनसेचे पुण्यातील नेते अजय शिंदे यांनी कुमठेकर रोडवरील खालकर चौकात मारुती मंदिर येथे सामूहिक हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
या कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे कार्यक्रम ठिकाणी हजर झाले. त्यांचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. (एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर भगवी शाल आणि चांदीची गदा देऊन मनसैनिकांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं.(एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
त्यानंतर राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आणि हनुमान चालिसा पठण कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले. (एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
यावेळी मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते उपस्थित होते (एक्स्प्रेस फोटो: पवन खेंगरे)
-
(File and Express Photos)

Mayuri Hagawane: “वैष्णवी गर्भवती असताना तिला…”, हगवणे कुटुंबाच्या छळाचा मोठ्या सुनेनं वाचला पाढा