-
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
-
रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच केकेचं रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी निधन झालं. तो ५३ वर्षांचा होता. विशेष म्हणजे तासाभरपूर्वी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारा केके अचानक आपल्याला सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीय.
-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज रविंद्र सदन येथे केकेला अखेरचा निरोप दिला.
-
केकेची पत्नी ज्योती त्यांच्या दोन्ही मुलांसोबत आज सकाळी कोलकात्यामध्ये दाखल झाली. शवविच्छेदनानंतर केकेचं पार्थीव रविंद्र सदन येथे ठेवण्यात आलं. त्याची पत्नी ज्योती पतीच्या पार्थिवाकडे पाहून हुंदके देत रडत होती.
-
आज कोलकात्यामधील सएसएकेएम रुग्णालयामध्ये केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं.
-
त्यानंतर केकेचं पार्थिव त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आलं.
-
केकेचं पार्थिव काही काळ रविंद्र सदन येथे ठेवण्यात आलं होतं. ममता बॅनर्जी यांनी केकेचं अंत्यदर्शन घेतलं. याचवेळी कोलकाता पोलिसांनी केकेला मानवंदना दिली.
-
हवेत बंदुकीच्या फैरी झाडून केकेला मानवंदना देण्यात आली.
-
ममता बॅनर्जीही केकेच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी रुग्णालयामध्ये पोहोचल्या होत्या.
-
यावेळेस रविंद्र सदनबाहेर केकेच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं.
-
केकेचा मुलगा नकुल हा वडिलांना शेवटचा निरोप देताना वाकून वाकून शवपेटीमध्ये पाहताना दिसला. तो फारच अस्वस्थ वाटत होता.
-
त्याचा आवाज हा आमच्या बऱ्या वाईट काळाचा कायमच सोबती राहीला. असा आवाज असणाऱ्या गायकाला आज शेवटचा निरोप दिला, अशा अर्थाच्या कॅफ्शनसीहत ममता यांनी फेसबुकवरुन केकेचं अंत्यदर्शन घेताना काही फोटो शेअर केलेत.
-
संगीत क्षेत्रामधील केकेचं योगदान कायमच लक्षात राहील. तो कायमच आमच्या हृदयामध्ये असेल असंही ममता यांनी म्हटलंय.
-
ममता बॅनर्जी यांनी केकेची पत्नी आणि नातेवाईकांचं सांत्वन करत त्यांना धीरही दिला.
-
केकेची मुलगी तमाराच्या डोळ्यातील पाणीही वडिलांना अखेरचा निरोप देताना थांबत नव्हतं. (सर्व फोटो सोशल मीडिया आणि एएनआयवरुन साभार)

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..