-
पुणे : धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असेलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराने आज सव्वाशेव्या वर्षात पदार्पण केले.
-
शहराच्या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याचे लक्ष्मी रस्ता असे नामकरण करुन लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
-
मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगताना दत्तमंदिर ट्रस्टचे अध्य अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई हे दीडशे वर्षांपूर्वी पुणे शहरातील एक श्रद्धाळू सत्शील, सधन, दानशूर आणि परोपकार दाम्पत्य होते.
-
नामांकित पहिलवान दगडूशेठ यांचा मिठाईचा व्यवसाय होता. लोकमान्य टिळक आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांसोबत दगडूशेठ यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते.
-
बुधवार पेठेतील दत्तमंदिर हे स्थान म्हणजे या दांपत्याचा वाडा होता. १८९७ मध्ये दगडूशेठ यांचे निधन झाले. योगी माधवनाथा यांनी श्रीमती लक्ष्मीबाई यांना श्री दत्त उपासना करण्याचा उपदेश केला.
-
त्यांनी जयपूर येथून संगमरवरी श्री तयार करुन घेतली. आणि ज्येष्ठ वद्य पष्ठी म्हणजेच ६जून १९९८ रोजी श्रीमती लक्ष्मीबाईंच्या निवासस्थानी प्राणप्रतिष्ठापना केली.
-
मंदिराच्या सव्वाशेव्या वर्षातील पदार्पणानिमित्त (रविवार, १९ जून) सकाळी लघुरुद्र, अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख बाबामहाराज तराणेकर यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन तर हेलिकॉप्टरद्वारे मंदिरावर पुष्पवृष्टी असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल