-
गेल्या काही दिवसांपासून नुपूर शर्मा चांगल्याच चर्चेत आहेत. नुपूर शर्मा भाजपाच्या माजी प्रवक्त्या आहेत. पैगंबर मुहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजापने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे. नूपुर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एलएलएमची पदवी घेतली आहे. राजकारणासोबत त्या एक वकीलही आहेत.
-
भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या संजू वर्मा या अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी Truth & Dare – The Modi Dynamic नावाचे पुस्तकही लिहिले आहे.
-
शाझिया इल्मी या पत्रकार आहेत. पत्रकारिता सोडल्यानंतर शाझिया इल्मी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आणि राजकारणाला सुरुवात केली. नंतर त्यांनी आपला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांची राष्ट्रीय प्रवक्ता पदी नेमणूक केली आहे.
-
हरारा सारंग या माजी आयएएस अधिकारी आहेत. २०१८ मध्ये व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांना राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत ठेवले आहे.
-
हिना गावित यांचाही भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या यादीत समावेश आहे. हिना गावित या डॉक्टर आहेत. त्या लोकसभेच्या सदस्याही होत्या. हिना गावित यांना राजकारणाचा वारसा लाभला आहे.
-
भारती घोष याही भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. राजकारणात येण्यापूर्वी भारती घोष आयपीएस अधिकारी होत्या. वर्षानुवर्षे त्यांनी नक्षलवाद्यांशी लढा दिला आहे.

‘या’ दोन हेल्थ इन्शुरन्सची Cashless Treatment सुविधा १ सप्टेंबरपासून बंद; लाखो रुग्णांना बसणार फटका