-    सांगलीत पाणी नसलेल्या बांधीव विहिरीत पडलेल्या रानमांजराला वाचवण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले. 
-    मिरज-कवठे महांकाळ तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या दंडोबा डोंगरावर विहिरीत हे रानमांजर अडकले होते. 
-    दंडोबा डोंगरावर गिर्यारोहणसाठी गेलेल्या तरुणांना विहिरीत प्राणी पडला असल्याचे दिसले. त्यांनी वन विभागाला विहिरीत कोल्हा पडल्याचे सांगितले. 
-    वन क्षेत्रपाल युवराज पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील, सागर थोरात, पूजा राजमाने, भोला पाटील आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 
-    पाहणी केल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तो कोल्हा नसून रानमांजर असल्याचे लक्षात आले. 
-    ५० फूट खोलीची विहीर सिमेंट काँक्रीटने बांधलेली असल्याने दोरीच्या शिडीवरुन खाली उतरून जाळीच्या मदतीने रानमांजराला वर काढले. तपासणी करून त्याला पुन्हा मुक्त करण्यात आले. 
 
  पैसाच पैसा! ‘या’ ३ राशींची नोव्हेंबरपासून खरी दिवाळी; मंगळाचं भ्रमण देईल अमाप संपत्ती, करिअरमध्ये मिळणार मोठं यश 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  