
चित्रपटात सुपस्टार म्हणून काम करणारे निरहुआ, रवी किशन आणि मनोज तिवारी आता लोकसभेत खासदार आहेत. मनोज तिवारी दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. रवी किशन आणि निरहुआ पहिल्यांदाच संसदेत पोहचले आहेत

रवी किशन आणि निरहुआ पहिल्यांदाच संसदेत पोहचले आहेत. मात्र, या खासदारांचे शिक्षण किती झालं आहे माहीती आहे? घ्या जाणून

२०१९ मध्ये अखिलेश यादव यांच्याकडून निरहुआ पराभूत झाले होते. त्यानंतर २०२२ च्या पोटनिवडणुकीत आझमगडमधून निरहुआ विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.

आपल्या गाण्यांनी लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या निरहुआने फक्त बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे.

१९९७ मध्ये त्यांनी बंगाल बोर्डातून इंटरमिजिएटचे शिक्षण पूर्ण केले.

रवी किशन यांना भोजपुरी चित्रपटांचा शाहरुख खान म्हटले जाते. त्यांनी केवळ भोजपुरीच नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. रवी किशन गोरखपूरमधून विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत.

रवी किशन देखील १२वी पास आहेत. रवी किशन यांनी मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून इंटर परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

कॉलेजच्या दिवसांपासून मनोज तिवारींना गाण्याची आवड होती. मनोज तिवारी भोजपुरीतील सर्वात यशस्वी गायक म्हणून ओळखले जातात. गायन सोडल्यानंतर त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटवला आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये ईशान्य दिल्लीतून निवडणूक जिंकणारे भाजप खासदार मनोज तिवारी हे निरहुआ आणि रवी किशन यांच्यापेक्षा जास्त सुशिक्षित आहेत.