-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मोफत रेवडी (उत्तर भारतातील गोड मिठाई) वाटून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. ही रेवडी संस्कृती देशासाठी घातक आहे,” असे म्हणत विरोधकांवर शनिवारी टीका केली होती. मोदी यांच्या याच टीकेला आता विरोधक जशास तसं उत्तर देत आहेत. काँग्रेसने तर #मोदी-की-रेवडियां या हॅशटॅग खाली ट्विटरवर खास मोहीम राबवली असून मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांचा पाढाचा वाचला आहे.
-
काँग्रेसने मोदींच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार आणि देशातून पलायन केलेल्या बड्या उद्योगपतींचा संदर्भ देत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. गरिबांचे कर्ज माफ करताना घाम फुटतो, मात्र त्यांचे मित्र मोफतच्या रेवडीचा आनंद लुटतात, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
-
नीरव मोदी यांनी पीएनबी बँकेला जवळपास १४ हजार कोटी रुपयांना लुबाडलं. त्यानंतर नीरम मोदी यांनी देशातून पलायन केलं. कोण मोफत रेवड वाटप करत आहे, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
-
मेहुल चोक्सी यांचे ६२२ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्यांनीदेखील देसातून पलायन केले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
-
७०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करणारे ललित मोदी यांनी देशातून पलायन केलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची रेवडी संस्कृती फक्त सामान्य जनतेसाठी लागू होते. त्यांच्या फसव्या मित्रांसाठी हे लागू होत नाही, असा टोला काँग्रेसने लागावला आहे.
-
तसेच, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांचे ८०४८ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. हे दोन्ही उद्योगपती देशातून पळून गेले, असे म्हणत काँग्रेसने नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल