-
साफसफाईचं काम आपल्याकडे दुय्यम मानलं जातं. सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांकडेही आपण दुर्लक्ष करतो. मात्र ऑस्ट्रेलिया या देशात सफाई कर्मचाऱ्यांना भरगोस पगार दिला जातोय.
-
भगरोस पगार देऊनही येथे सफाई कामगार मिळत नाहीयेत. येथील कंपन्या सफाई कामगारांना ७२ लाख रुपयांपासून ते आठ कोटी रुपयापर्यंतचे पॅकेज देण्यास तयार आहेत. मात्र तरीदेखील या कंपन्यांना सफाई कामगार मिळत नाहीयेत.
-
याबाबतचे वृत्त डेली टेलीग्राफने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार ऑस्ट्रेलिया येथील Absolute Domestics नावाची कंपनी सफाई कामगारांना दुप्पट, तिप्पट पगार देण्यास तयार आहे.
-
काही कंपन्या तर या कामगारांना कामाचे प्रतितास ४७०० रुपये देण्यास तयार आहेत.
-
मात्र येथे सफाई कर्मचाऱ्यांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. Absolute Domesticsचे व्यवस्थापकीस संचालक जोए वेस यांनी याबाबत सविस्तर सांगितले आहे.
-
“आम्हाला सफाई कामगारांचा पगार वाढवावा लागतोय. पूर्वी आम्ही या कामगारांना २७०० रुपये प्रतितास अशा स्वरुपात पगार द्यायचो. मात्र आता आम्ही या कामगारांना ३५०० रुपये प्रतितास या प्रमाणे पैसे देण्यास तयार आहोत,” असे वेस यांनी सांगितले.
-
तसेच, “आम्ही या कर्मचाऱ्यांना सर्व सोईसुविधा देण्यास तयार आहोत, तरीदेखील आम्हाला कर्मचारी मिळत नाहीयेत,” अशी खंत वेस यांनी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियामध्ये कंपन्यांना वर्षभरापासून या अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे कोट्यवधींचे पॅकेज देऊनही येथे येथे सफाई कर्मचारी मिळत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Kidney Disease Early Signs: किडनी खराब व्हायला लागल्यास त्वचेवर दिसतात ‘ही’ ६ लक्षणे, आरशात दिसणारे बदल वेळीच ओळखा, नाहीतर सायलेंट किलर..