-
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी, वाढती महागाई याविरोधात आज काँग्रेसकडून देशभरात निदर्शने केली गेली.
-
राजधानी दिल्लीमध्येही खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचे खासदार तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
-
नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीकडून आज पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. या चौकशीच्या तसेच महागाई आणि भाजपा पक्षाच्या निषेधार्थ आज दिल्लीमधील विजय चौकात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
-
यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेले आर्थिक गैरव्यहाराचे आरोप खोटे आहेत, असा दावा केला.
-
या निदर्शनादरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
-
त्यानंतर भाजपाकडून सत्तेचा गौरवापर सुरु आहे. महिला कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनी गैरव्यवहार केला, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
-
काँग्रेसचे आंदोलनकर्ते संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार होते, मात्र त्यांना दिल्ली पोलिसांनी थांबवून ताब्यात घेतले.
-
काँग्रेसने केलेल्या या आरोपांना दिल्ली पोलिसांनी उत्तर दिलेले नाही. तसेच आंदोलन कर्त्यांना कोठे नेले जात आहे, याचीही माहिती दिली नाही. (सर्व फोटो- काँग्रेस ट्विटर)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल