-    राज्यातील गणपती विसर्जन मिरवणुका या कायमच चर्चेत असतात. यंदा दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. 
-    वाजत-गाजत बाप्पाला निरोप देताना भक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता. 
-    निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळी अनेक राजकीय नेतेही गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले दिसले. 
-    परंतु या सगळ्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधून घेतलं. 
-    रोहित पवार पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले दिसले. 
-    गणरायाची वैभवशाली विसर्जन मिरवणूक ही पुण्याची परंपरा आहे. 
-    रोहित पवारांनी यात सहभागी होत मंडळाचे कार्यकर्ते आणि भक्तांचा आनंद द्विगुणित केला. 
-    पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते सहभागी झालेले दिसले. 
-    यावेळी तरुणांकडून मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. 
-    रोहित पवारांनी या पथकाबरोबर लाठी-काठी फिरवत मर्दानी खेळ खेळत सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले. 
-    लाठी-काठीचे खेळ खेळताना रोहित पवार. 
-    गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवारांनी बाप्पासाठी ढोलवादनही केले. 
-    पुण्यातील मानाच्या तिसरा गुरुजी तालिम गणपती मंडळासमोर ढोल पथकाबरेबर त्यांनी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला. 
-    ढोलवादन करताना रोहित पवार. 
-    विर्सजन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एका बाप्पाच्या रथाचं सारथ्य करतानादेखील रोहित पवार दिसले. 
-    एवढंच काय रोहित पवारांनी कार्यकर्त्यांसह उसाचा रस आणि कचोरी खाण्याचा आनंद लुटला. 
-    कचोरीचा आस्वाद घेताना रोहित पवार. 
-    गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत रोहित पवार गुलालाने पूर्णत: माखून गेले होते. 
-    पुण्यातील विसर्जन मिरवणुकीतील त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. 
-    (सर्व फोटो : रोहित पवार/ इन्स्टाग्राम) 
 
  ज्येष्ठ अभिनेते असरानी यांची शेवटची पोस्ट काय होती? इन्स्टाग्रामवर लिहिला ‘तो’ संदेश, त्यानंतर आली निधनाची बातमी 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  