-
काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातील सहावा दिवस आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यातून ही यात्रा प्रवास करत आहे. आज ( १२ नोव्हेंबर ) काँग्रेस नेते राहुल गांधींनी हिंगोलीत जनतेला संबोधित केलं.
-
तेव्हा स्वर्गीय राजीव सातव यांच्या आठवणींना राहुल गांधी उजाळा दिला. राजीव माझे चांगले मित्र होते. त्यांनी नेहमी तुमच्यासाठी काम केलं, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
-
देशात द्वेष पसरवला जात असून, भांडणे लावली जात आहेत. पण, द्वेष पसरवला जाऊ शकत नाही, हा संदेश घेऊन आम्ही चालत आहोत, असेही राहुल गांधी म्हणाले.
-
तसेच, शेतकऱ्यांच्या पिक विम्यावरून राहुल गांधी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पावसाने शेतातील सर्व पीक वाया गेलं आहे. पण, पीकविमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नाही.
-
शेतकऱ्यांना कोणाकडे दाद मागावी, याची कल्पना नाही. मोदी सरकारच्या काळात शेतकरी आणि शेती संपवण्याचं काम केलं जात आहे.
-
शेतकऱ्यांकडून विमाचे हप्त्यापोटी पैसे घेतले जातात. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही.
-
मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या असून, शेतकरी कंगाल झाले आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.
-
काँग्रेसच्या काळात पेट्रोल आणि गॅस दरवाढीवरून पंतप्रधान मोदी प्रश्न विचारायचे. पण, आता गॅस १२०० रुपयांना आणि पेट्रोल १०६ रुपयांवर गेलेलं असताना, पंतप्रधान मोदी गप्प आहेत.
-
या देशात तीन चार अरबपती आहेत. त्यांना पाहिजे, ते उद्योग, व्यवसाय ते करु शकतात. पण, देशातील युवकाला नोकरी मिळू शकत नाही, असेही राहुल गांधींनी म्हटलं.

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…