-
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बंडखोरीचा आरोप झालेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
सत्यजीत तांबेंनी शनिवारी (४ फेब्रुवारी) नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय गौप्यस्फोट केलेत याचा हा आढावा…
-
माझी प्रामाणिक इच्छा होती की, मला महाविकासआघाडीने तातडीने पाठिंबा द्यावा – सत्यजीत तांबे
-
आम्ही दिल्लीशी संपर्कात होतो – सत्यजीत तांबे
-
मला दिल्लीतून सांगण्यात आलं की, तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसचा पाठिंबा मागा – सत्यजीत तांबे
-
मी पत्र लिहिलं आणि पाठवलं. त्यांनी पत्रात हा शब्द समाविष्ट करा, तो समाविष्ट करा सांगितलं. आमचा पूर्ण एक दिवस ते पत्र अंतिम करण्यात गेला – सत्यजीत तांबे
-
दिल्लीतील नेते मला म्हणाले की, तुला जाहीर माफी मागावी लागेल – सत्यजीत तांबे
-
मी म्हटलं, माझी काहीच चूक झालेली नाही – सत्यजीत तांबे
-
ते म्हटले, तरीही माफी मागावी लागेल – सत्यजीत तांबे
-
मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो. मी म्हटलं, मी जाहीर माफीही मागेन, काही हरकत नाही – सत्यजीत तांबे
-
कारण ज्या पक्षात मी आयुष्यभर काम केलं त्या पक्षाला सोडून भूमिका घेणं मला योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे मी माफी मागायलाही तयार झालो – सत्यजीत तांबे
-
याबाबत मी एच. के. पाटील यांना माझ्या स्वाक्षरीनिशी एक पत्र लिहिलं – सत्यजीत तांबे
-
हे पत्र मी त्यांना १९ जानेवारीला पाठवलं. म्हणजे १७,१८,१९ असे तीन दिवस आम्ही बोलत होतो – सत्यजीत तांबे
-
माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही बोलणं झालं होतं – सत्यजीत तांबे
-
१६ की १७ जानेवारीला मी स्वतः नाना पटोलेंना फोनही केला होता. तसेच तुम्ही ही भूमिका सोडून द्या आणि मला पाठिंबा द्या, अशी मागणी केली – सत्यजीत तांबे
-
मी काँग्रेसचा आहे, असंही मी सांगितलं – सत्यजीत तांबे
-
माझ्याकडे संजय राऊतांना पाठवलेले मेसेजही आहेत – सत्यजीत तांबे
-
मी मविआच्या पाठिंब्याची प्रामाणिक अपेक्षा केली – सत्यजीत तांबे
-
एकीकडे मी दिल्लीच्या नेत्यांशी बोलतो आहे. दिल्लीतील नेते माझ्याकडून लेखी पत्र मागत आहेत – सत्यजीत तांबे
-
दिल्लीवाले मला माफी मागायला सांगत आहेत. मी तेही करायला तयार होतो – सत्यजीत तांबे
-
दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आम्ही अमूक उमेदवाराला पाठिंबा देणार, सत्यजीत तांबेंनी आम्हाला फसवलं, तांबेंनी धोका दिला, असं बोलत होते – सत्यजीत तांबे
-
ज्या लोकांना सुधीर तांबे आणि थोरात-तांबे कुटुंब माहिती आहेत ते कधीच यावर विश्वास ठेवणार नाही की, हा परिवार कधी कुणाला फसवू शकतो – सत्यजीत तांबे
-
असं असताना आमच्यावर वारंवार फसवल्याचे, धोका दिल्याचे, अंधारात ठेवल्याचे आरोप करण्यात आले – सत्यजीत तांबे
-
मी माफीचं पत्र दिलं त्यानंतर दोन तासांनी मविआने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला – सत्यजीत तांबे

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर