-
श्री संत गजानन महाराज यांचा आज १४५ वा प्रकट दिन आहे. यानिमित्ताने बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची मांदियाळी बघायला मिळत आहे.
-
राज्यभरातील आणि शेजारील मध्य प्रदेशातील तसंच गुजरातमधून सुद्धा जवळपास एक हजाराच्या वर दिंड्यासह लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत.
-
“श्री गजानन महाराज की जय” आणि “गण गण गणांत बोते” च्या जयघोषात संपूर्ण शेगाव दुमदुमुन निघाले आहे.
-
शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
-
केवळ शेगावातच नव्हे तर संत गजानन महाराज यांचे मठ असलेल्या राज्यातील विविध ठिकाणीही विविध कार्यक्रमांचे आयोजन आजच्या दिवशी केले जाते.
-
श्री गजानन महाराज प्रकट दिन हा एक शुभ दिवस मानला जातो.
-
गजानन महाराजांच्या प्रकटदिनी दिवशी शेगाव इथून श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जातात.
-
महाराजांच्या प्रकट दिनी हजारो भक्त, लोक शेगाव इथे प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजेरी लावतात.
-
‘गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो.
-
गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आले आहे.
-
इतर राज्यातून हजारो भाविक आपल्या दिंड्या घेऊन शेगावात दाखल झाल्या आहेत.
-
सर्व भाविक पूजा, दान, सत्संग, प्रार्थना आणि अन्नदान यांमध्ये विशेष सहभाग नोंदवतात.

Vat Purnima 2025 : वट पौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर