-
सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या संकेतस्थळासाठी करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत पुलवामा हल्ला, कलम ३७०, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भ्रष्टाचारासाठी पाठिंबा असे अनेक दावे केले आहेत.
-
अदाणी प्रकरणात मोदी सरकारचं खूप सारं नुकसान झालंय. हे नुकसान शेवटच्या स्तरापर्यंत झिरपलं आहे.
-
२०१४मध्ये अदाणी हा निवडणुकीचा मुद्दा होईल. यांनी जर वेळीच सुधारणा केली नाही तर अदाणी यांना संपवून टाकेल.
-
जर विरोधकांनी एका उमेदवाराच्या समोर दुसरा उमेदवार दिला तर हे वाचूच शकणार नाहीत. इतक्या कमी जागा येतील की यावर विश्वासच बसणार नाही की यांचं सरकार कधीकाळी होतं.
-
मोदी शांत राहून धोका ओढवून घेत आहेत. मला माहिती नाही की त्यांना कुणी सल्ला देतंय की नाही ते. मी त्यांना सल्ला देतोय की कृपा करून अदाणी प्रकरणातून हात काढून घ्या.
-
२० हजार कोटींच्या आरोपांचं उत्तर ते देऊ शकत नाहीयेत. लोकांचा यावर विश्वास बसू लागला आहे की अदाणींच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोदींना रस आहे.
-
यांचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. तिथला सगळा पैसा ते मुख्यमंत्री तर खात नाहीयेत. तो इथेही येतो आहे. इथून तो पैसा कुठेतरी जात असावा. कदाचित तो पैसा अदाणींकडे जात असावा अशी चर्चा लोक करत आहेत.
-
संसदेत राहुल गांधींच्या एकाही प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत. त्यांना त्यांच्या बचावात एकही शब्द उच्चारता आले नाही.
-
मी हे बोललो त्याबद्दल काय करतील ते? माझा जीव घेऊ शकत नाहीत. माझा समाज खूप मोठा आहे, त्याला हात लावू शकत नाही, त्यांची दुर्दशा होईल.
-
शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मी बोलल्यामुळे माझ्यामागे एवढा पाठिंबा आहे की ज्या दिवशी मला हात लावतील, त्या दिवशी यांना कळून चुकेल. यांना कुठे जाहीर सभा घेता येणार नाहीत.
-
मी फकीर माणूस आहे. माझ्याकडे तसं काही नाहीये. भाड्याच्या घरात राहातो. मालमत्ता मी जमवलेली नाही. मी तर राजकारणात येऊन बापजाद्यांचा जमीनजुमलाही विकून टाकला.
-
राहुल गांधींना बोलू न देणं फार चुकीची गोष्ट होती. त्यांना अपात्र का ठरवलं गेलं हे सगळ्यांना माहिती आहे. नरेंद्र मोदी राहुल गांधींमुळे फार अस्वस्थ झाले आहेत. अदाणींचा एकदम योग्य मुद्दा राहुल गांधींनी उचलला आहे.
-
मला सांगितलं गेलं की राष्ट्रपतींच्या अपॉइंटमेंटची यादीही पंतप्रधान कार्यालयात जाते. तिथून मान्यता मिळाल्यानंतर त्या लोकांना त्या भेटतात. त्यांना हवं त्या व्यक्तीला त्या भेटू शकत नाहीत. त्या पंतप्रधानांच्या हातातलं बाहुलं आहेत.
-
काश्मीरच्या बाबतीत तर मला सक्त ताकीद दिली होती की काहीही बोलायचं नाही. गोव्यात तर मला एक दिवस फोन करून मला म्हणाले की तुम्ही जर काश्मीरबद्दल पुन्हा बोललात तर मी तुम्हाला पुन्हा कधीच नाही भेटणार.
-
पुलवामा हल्ल्याच्या दिवशी सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्यांनी नकार दिला. मला विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं.
-
मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा.
-
काश्मीरमधील जनतेला ३७० कलम हटवण्यापेक्षा राज्य केंद्रशासित प्रदेश केलं याचं जास्त वाईट वाटलं. यातही माझा सल्ला घेतला गेला नाही. सल्ला घेतला असता तर मी सांगितलं असतं की हे नका करू.
-
राज्य केंद्रशासित प्रदेश केलं तर तिथले पोलीस थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येतात. नाहीतर पोलीस राज्य सरकार किंवा राज्यपालांच्या नियंत्रणाखाली असतात, म्हणून हा निर्णय घेतला गेला असं मला वाटतं. तेव्हा अशी भीती होती की तिथले पोलीस बंड करू शकतात
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सगळ्या जगाचं जे मत आहे ते माझं नाही. मी त्यांना जेव्हा केव्हा भेटलो, तेव्हा मला जाणवलं की त्यांना अजिबात काही माहिती नाही.
-
मी एकदा उदाहरण म्हणून सांगितलं की काश्मीरमधली खरी समस्या जमात आहे. त्यांना त्याची काही काळजीच नव्हती.
-
जमात खूप शक्तीशाली आहे.पण मोदींना काहीच माहिती नाही. ते आपल्याच धुंदीत आहेत. मी दोन-तीन वेळा त्यांना सांगितलं की काश्मीरचा मुद्दा सुटू शकतो. पण ते त्यासाठी इच्छुक नव्हते.
-
मी शपथेवर सांगू शकतो. मला काहीच माहिती नव्हतं. ४ तारखेला रात्री मला गृहमंत्र्यांचा फोन आला की सत्यपाल मी एक चिठ्ठी पाठवतोय. सकाळी ११ वाजेच्या आधी तुमच्या कमिटीकडून मंजूर करून पाठवून द्या. माझ्या चिठ्ठीशिवाय कलम ३७० हटलंच नसतं.

Mothers Day 2025: “घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही…” आईला मातृदिनाच्या द्या हटके शुभेच्छा; एकापेक्षा एक सुंदर मेसेज अन् फ्री डाउनलोड करा HD फोटो