-
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे दोन पक्षा या राजकीय घडामोडींचं केंद्र ठरत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे पक्षातील काही आमदारांचा गट घेऊन भाजपाबरोबर जातील अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या सर्व चर्चांना मंगळवारी ( १८ एप्रिल ) अजित पवारांनी पूर्णविराम देत आपली भूमिका स्पष्ट केली.
-
“आम्ही आमचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहोत.”
-
“जोपर्यंत जीवात जीव आहे, तोपर्यंत पक्षाचचं काम करणार. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनात कोणताही संभ्रम न ठेवता निश्चिंत राहावे,” असं आवाहन अजित पवारांनी केलं.
-
अजित पवार म्हणाले, “सध्या आमच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही. सर्व बातम्या निराधार आहेत.”
-
“कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या इतर सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू आहे.”
-
“मी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या, ही बातमीही खोटी आहे,” असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. आम्ही परिवार म्हणून काम करतो, यापुढेही पक्षाचं काम सुरू ठेवणार.”
-
“मला आज काही आमदार भेटले. ते त्यांच्या मतदारसंघातील कामांबाबत भेटले, अन्य कोणताही हेतू नाही,” असेही अजित पवार म्हणाले.
-
“राज्यासमोर बेरोजगारी, महागाई यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा चर्चा घडवून आणल्या जात आहेत.”
-
“मी राष्ट्रवादी सोडून जाणार नाही, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?,” असा संतप्त सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
-
“महाविकास आघाडीसोबत राहून ही आघाडी मजबूत करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला आहे.”
-
“मी ट्विटरवरून पक्षाचं चिन्ह हटवलेलं नाही. आता काय कपाळावर पक्षाचं चिन्ह लावून फिरू का?,” असा खोचक टीप्पणी अजित पवारांनी केली आहे.

ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल