-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या तर्कवितर्कांनी राज्याच्या राजकारणातील घडामोडींना वेग आला होता. यावर शिंदे गटातून अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्याचा हा आढावा…
-
अजित पवार हे डॅशिंग नेते आहेत, ते काही नॉट रिचेबलवाले नेते नाहीत- गुलाबराव पाटील
-
त्या माणसाला कायतरी जीवन आहे. ते २४ तास काम करत असतात. त्यामुळे मला नाय वाटत ते कुठलाही निर्णय घेताना घाबरून निर्णय घेतील- गुलाबराव पाटील
-
निश्चितपणे जुळवाजळव करायला थोडा वेळ लागतोय. परंतु जुळवाजुळव होईल तेव्हा मला वाटतं भाजपा आणि शिवसेनेत पाऊस पडेल- गुलाबराव पाटील
-
भाजपा, शिवसेना आणि अजित दादा एकत्र आले तर ‘अमक अकबर अँथोनी’ चांगला पिक्चर चालेल- गुलाबराव पाटील
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वक्तव्ये पाहा जरा. आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले की, आम्ही अजित पवारांच्या मागे आहोत. आमदार अण्णा बनसोडे काय म्हणाले ते पाहा. हे कशाचं द्योतक आहे?- गुलाबराव पाटील
-
त्यांचे आमदार असं का बोलत आहेत? मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मला नाही वाटत अजित पवार आता तिथे थांबतील- गुलाबराव पाटील
-
अजित पवारांनी भाजपाबरोबर जात पहाटे शपथ घेतली होती. अजित पवार काहीही करू शकतील, हे त्यांनी कृतीतून दाखवलं आहे- गजानन कीर्तिकर
-
अजित पवार भाजपाबरोबर जात असतील, तर त्यास आमचा विरोध असण्याचं कारण नाही- गजानन कीर्तिकर
-
राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासारखा नेता काही आमदारांसह बाहेर पडत असेल, तर आम्ही स्वागत करू- गजानन कीर्तिकर
-
अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे – संजय शिरसाट
-
अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांचीही ईडी चौकशी सुरु आहे. मग, यांना भीती नाही का? – संजय शिरसाट
-
फक्त तुम्हालाच भीती वाटतं आहे का? हे सर्व खोटं आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही. भाजपाने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे – संजय शिरसाट
-
भारतीय जनता पार्टी आणि आमचं (शिवसेना – शिंदे गट) २०० प्लस जागा जिंकण्याचं (२०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचं) टार्गेट सेट आहे – शंभूराज देसाई
-
त्यात अजित पवारांसारखं कोणी येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे – शंभूराज देसाई
-
भाजपा, शिवसेना, आरपीआय, इतर मित्रपक्ष आणि अपक्ष अशी आमची महायुती आहे. ही महायुती अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात आणखी कोण येणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे – शंभूराज देसाई

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”