-
युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे खंदे समर्थक राहुल कनाल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. राहुल कनाल शनिवारी ( १ जुलै ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
-
काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने राहुल कनाल यांच्या घरावर छापेमारी केली होती. पण, त्यात काहीच निप्षन्न झालं नव्हतं.
-
या परिस्थितीत राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. मात्र, युवासेनेतील अंतर्गत राजकारणामुळे राहुल कनाल शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहेत.
-
राहुल कनाल कोण आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
आदित्य ठाकरे यांची कोअर कमिटी ही युवासेनेची ताकद मानली जाते. या कोअर कमिटीतील आणि आदित्य ठाकरे यांच्या एकदम जवळची विश्वासू व्यक्ती म्हणून राहुल कनाल यांची ओळख आहे.
-
राहुल कनाल मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते.
-
महाविकास आघाडीची सत्ता असताना शिर्डी देवस्थान समितीवर ते सदस्य राहिले आहेत.
-
सलमान खान आणि विराट कोहली यांच्यासारख्या सेलिब्रिटींबरोबर राहुल कनाल यांचं मैत्रीचे संबंध आहेत.
-
दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी राहुल कनाल यांचे संबंध जोडण्यात आले होते.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक