-
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील पोहरादेवीच्या दर्शनाने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या फुटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
-
“जसे दिसते, तसे पक्षफुटीकडे पाहत आहे,” असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
-
“पूर्वी पक्ष फोडला जायचा. आता पक्ष पळवला जात आहे. पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळत आहे,” असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांना नोटीस बजावली आहे. याकडे कसं पाहता? असा प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने अर्थ काढून दिला आहे, यापलीकडे कोणालाही पाहता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. त्या निकालाच्या चौकटीत अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. चौकटीच्या बाहेर जर निर्णय दिला, तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत.”
-
विदर्भ दौऱ्यावर भाजपाने टीका केली आहे, याबद्दल विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “भाजपा काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिला नाही.”
