-
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली.
-
ठाकरेंनी दाढीवाला, अमिबा, इंडियन मुजाहिद्दीन ते चांद्रयान असे अनेक उल्लेख करत मोदींवर हल्लाबोल केला.
-
ते रविवारी (२७ ऑगस्ट) हिंगोलीतील सभेत नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
आम्ही ‘इंडिया’ आघाडी म्हणून एकत्र आलो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड घसरले. त्यांनी इंडियाचा उल्लेख घमेंडीया करून टाकला – उद्धव ठाकरे
-
ते आम्हाला घमेंडीया म्हणत असली, तर आम्हीही त्यांना घमेंडीए असं म्हणतो. ते एनडीए आहेत, पण घमेंडी, गर्विष्ट आहेत – उद्धव ठाकरे
-
आता जो एनडीए म्हणून शिल्लक राहिलाय त्याला काही आकार उकार, शेंडा बुडखा शिल्लक राहिलेला नाही – उद्धव ठाकरे
-
अमिबा नावाचा एकपेशीय जीव पोटात गेला की पोट बिघडतं. तो एकपेशीय असतो, पण त्यालाही आकार उकार काही नसतं – उद्धव ठाकरे
-
अमिबा कसाही वाढत असतो, तशीच स्थिती एनडीएची झाली आहे. एनडीएचा आता अमिबा झाला आहे – उद्धव ठाकरे
-
यांच्याबरोबर मुळात पक्ष आहेच किती. पक्ष फोडून केवळ थिगळं लावून एनडीए उभी केली जात आहे – उद्धव ठाकरे
-
आम्ही इंडियाचं नाव घेऊन पुढे आलो आहोत, तेव्हा ते आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करतात – उद्धव ठाकरे
-
इथे जमलेले सगळे दहशतवादी आहेत का? माझ्या प्रेमाखातर माझे विचार ऐकायला इथे आलेले दहशतवादी आहेत का – उद्धव ठाकरे
-
इथे जमलेल्यांनी आपलं काम करायचं थांबवलं तर यांचं सरकार गडबडेल, पीक पिकणार नाही. उद्योगधंदे चालणार नाही – उद्धव ठाकरे
-
असा हा घाम गाळणारा माझा शेतकरी-कामगार माझ्यासमोर बसलेला आहे. हा अतिरेकी नाही – उद्धव ठाकरे
-
हे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे, देशद्रोहाचे आरोप करतात आणि तेच लोक यांच्या पक्षात आले की, धुवून साफ होतात – उद्धव ठाकरे
-
पूर्वी निरमा वॉशिंग पावडर होती, आता भाजपा पावडर आहे. आपल्याही दाढीवाल्याने ही पावडर लावली आहे. ही पावडर लावल्यावर सगळे साफ झाले आहेत – उद्धव ठाकरे
-
काल परवा मोदी अफ्रिकेत गेले होते. मोदी मणिपूरमध्ये गेले नाही तरी हरकत नाही, पण ते दक्षिण अफ्रिकेला गेले – उद्धव ठाकरे
-
मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, मोदी तिकडे ‘प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ म्हणून गेले होते, भारत मातेचे, इंडियाचे पंतप्रधान म्हणून अफ्रिकेला गेला होतात, की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून तिकडे गेला होतात? हे त्यांनी सांगावं – उद्धव ठाकरे
-
इंडियाचं चांद्रयान चंद्रावर उतरलं म्हणून अभिमान वाटला की इंडियन मुजाहिद्दीनचं चांद्रयान उतरलं म्हणून अभिमान वाटलं हे मोदींनी आधी सांगावं – उद्धव ठाकरे
-
आम्ही देश वाचवायला पुढे आलो आहोत. देशातील लोकशाही वाचवायला पुढे आलो आहोत – उद्धव ठाकरे
-
होय, मी मेहबुबा मुफ्तीबरोबरही बसलो होतो. कारण मेहबुबा मुफ्तीही भाजपाच्या लाँड्रीत धुवून आलेल्या आहेत. त्यांचाही पक्ष भाजपाने धुतला आहे – उद्धव ठाकरे
-
भाजपा त्यांच्या मांडीला मांडी लावून काश्मीरमधील सरकारमध्ये बसली होती. ते काय म्हणून माझ्यावर आरोप करत आहेत, कशासाठी आरोप करत आहेत – उद्धव ठाकरे
-
त्यांना आमची तुलना इंडियन मुजाहिद्दीनशी करायची असेल, तर इंडियन मुजाहिद्दीनला पाठिंबा कोण देतं? कोणता देश त्यांना पाठिंबा देतो? – उद्धव ठाकरे
-
दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठिंबा देतो, मग क्रिकेट विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हेच त्यांचं हिंदुत्व आणि राष्ट्रियत्व आहे का? – उद्धव ठाकरे
-
हे भारत पाकिस्तान सामना यांच्या मैदानात खेळवणार आणि देशप्रेमाचे धडे आम्हाला शिकवणार. यांच्यापेक्षा सुषमा स्वराज बऱ्या होत्या – उद्धव ठाकरे
-
सुषमा स्वराज यांनी सांगितलं होतं की, जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशात घुसखोरी थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेऊ इच्छित नाही – उद्धव ठाकरे
-
याला म्हणतात देशप्रेम. एकीकडे हे जाऊन मिठ्या मारतात आणि आमच्यावर देशद्रोहाचे आरोप करतात. मोदींना हे शोभत नाही – उद्धव ठाकरे
-
सर्व छायाचित्र – संग्रहित

अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात