-
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं.
-
“टरबुज्यासारखा माणूस मी पाहिलेला नाही. पण, आता टरबुज्यासारखा गोल माणूस मी पाहतो”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे.
-
“त्यांनी ( देवेंद्र फडणवीस ) भाजपा आणि पक्षातील प्रतिस्पर्धी एकनाथ खडसे यांना संपवण्याचं काम केलं. आता आयारामांना निष्ठावंतांच्या उरावर बसवले आहेत. अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे महाराष्ट्रात ‘आयाराम’ मंदिर बांधत आहेत,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.
-
“भाजपाला कोणताही विचार नव्हता. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची दिशा दाखवली नसती, तर तळागळात कुठे गेला असता, कळलं नसतं,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
-
जालन्यातील आंदोलनावर बोलताना उद्धव ठाकरेंनी काही सवाल उपस्थित केले. “पोलिसांनी करोनाकाळात स्वत:चा जीव धोक्यात घालून जनतेचे प्राण वाचवले.”
-
“पण, शांततेत चाललेल्या आंदोलनात एवढा ताफा घुसू शकतो का? बेछूट लाठीहल्ला करू शकता का? आंदोलकांवर अश्रूधूर आणि हवेत गोळीबार करू शकता का? जालिनवाला कांड झालं, तसं जालनावाला कांड झालं,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली आहे.
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”