-
लोकसभेच्या ५४३ जागांवर निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.
-
भारतात यंदा ९६ कोटी ८० लाख मतदार आहेत. १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. या तरुणांच्या मतांचा खूप मोठा वाटा या निवडणुकीत असणार आहेत, असेही राजीव कुमार म्हणाले.
-
भारतात यावर्षी ९७ कोटी मतदार आहेत. सगळ्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आम्ही आता निवडणूक आयोग म्हणून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो आहोत, असे सांगून राजीव कुमार यांनी निवडणूक यंत्रणेची आकडेवारी जाहीर केली.
-
विशेष बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत ८५ लाख नव्या महिला उमेदवार मतदान करणार आहेत. त्यामुळे अनेक पक्षांचा या मतदारांवर डोळा असेल.
-
देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक संपन्न होईल. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
-
महाराष्ट्रात ४८ मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यात निवडणूक होईल.
-
महाराष्ट्रात पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी सुरू होईल तर शेवटचा टप्पा २० मे रोजी संपन्न होईल. याचा अर्थ महाराष्ट्रात संपूर्ण महिना निवडणुकीची धामधूम चालणार आहे.
-
मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी ईव्हीएमवर आलेल्या प्रश्नांना शायरीच्या अंदाजात उत्तर देत, ईव्हीएम यंत्र पारदर्शक असल्याचे छातीठोकपणे सांगितले.
-
भारतात लोकशाही हा सर्वात मोठा उत्सव आहे. भारताच्या या उत्सवाकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. सर्वांनी मतदानाच्या दिवशी आवर्जून घराबाहेर पडत मतदान करावे, असेही आवाहन त्यांनी केलं.

“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा