-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नव्या संकुलाचे उद्घाटन केल्यावर त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नालंदा येथील काही फोटो शेअर केले होते, तसेच त्यामध्ये ते म्हणाले की देशाच्या शिक्षण क्षेत्रासाठी आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आणि खास आहे. आज उत्तर प्रदेशच्या राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नव्या संकुलाचे उद्घाटन होणार आहे. नालंदा हा आपला गौरवशाली इतिहासाचा भाग आहे. नालंदा विद्यापीठाचे नवे कॅम्पस आपल्या युवकांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि त्यांना पुढे घेऊन जाणारे ठरेल. (Photo- ANI)
-
त्यानंतर पंतप्रधान मोदींनी नालंदा विद्यापीठाचे उद्घाटन केले. (Photo- Naredra Modi/X)
-
बिहारमधील नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसच्या उद्घाटनावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंदीय मंत्री एस जयशंकर आणि इतरही मोठे नेते उपस्थित होते. (Photo- Naredra Modi/X)
-
यावेळी पंतप्रधानांनी नालंदाच्या प्राचीन संकुलात जाऊन पाहणी केली. तिथल्या महाविहार या परिसरात फेरफटका मारला. (Photo- PTI)
-
यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले “आगीच्या ज्वालांमध्ये पुस्तके जळू शकतात पण त्यांनी दिलेलं ज्ञान कोणी कधीच मिटवू शकत नाही.” (Photo- PTI)
-
यावेळी पंतप्रधानांनी नालंदा विद्यापीठाच्या सर्व इतिहासावर भाष्य केले. (Photo- Naredra Modi/X)
-
“जो देश मजबूत मानवी मुल्यांवर उभा असतो त्याला इतिहासाचे पुनरुज्जीवन करून चांगल्या भविष्याची पायाभरणी कशी करायची हे माहिती असते.”असेही ते म्हणाले. (Photo- Naredra Modi/X)
-
इसवी सन ११९३ मध्ये तुर्की सेनापती इख्तियारुद्दीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी याने नालंदा विद्यापीठावर सर्वात मोठा विनाशकारी हल्ला केला होता. (Photo- PTI) हे देखील पहा- PHOTOS : ज्याला मृत्यूपासून वाचवले त्यानेच लावली आग! खिलजीने का केला नालंदा विद्यापीठाचा सर्वनाश? वाचा इतिहास

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”