-
प्रदेश भाजपाचे अधिवेशन रविवारी (२१ जुलै) पुण्यात पार पडले. (Express Photo By Pavan Khengre)
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे राज्यातील मंत्री, नेते यावेळी उपस्थित होते. (Express Photo By Pavan Khengre)
-
शाहा, फडणवीस, तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांवर कडाडून टीका केली. (Express Photo By Pavan Khengre)
-
अजित पवार यांच्या महायुतीमधील समावेशामुळे आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर ‘संभ्रमा’त असलेल्या कार्यकर्त्यांना मार्ग दाखविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या अधिवेशनातून केला आहे. (Express Photo By Pavan Khengre)
-
या अधिवेशनात शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आले. (Express Photo By Pavan Khengre)
-
‘शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके आहेत,’ ‘पराभूत होऊनही राहुल गांधी अहंकाराने फुगले आहेत,’ ‘उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी असून औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत,’ अशा कडवट शब्दांत विरोधकांवर टीका करून भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला. (Express Photo By Pavan Khengre)
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विवेक’ साप्ताहिकातील लेखात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील युतीमुळे भाजप कार्यकर्ता ‘संभ्रमा’त असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्यावर टीका करतानाच हिंदुत्वाचा मुद्दाही जोरकसपणे मांडून कार्यकर्त्यांना एक प्रकारे या मुद्द्यांवर निवडणुका लढण्याचा संदेश दिला गेला. ‘हिंदुत्वाचा मुद्दा आणि विचारधारा भाजपने कधीही सोडलेली नाही. ध्येय साध्य करण्यासाठी तह किंवा सलगी करावी लागते,’ अशा शब्दांत कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न झाला. (Express Photo By Pavan Khengre)
-
‘महाविकास आघाडी म्हणजे हवा भरलेला फुगा असून, विधान परिषदेच्या निवडणुकीत फुग्याला टाचणी लागली आहे. विधानसभा निवडणुकीत हा फुगा फुटेल,’ अशा शब्दांत भाजप नेत्यांनी विरोधकांना धारेवर धरले. (Express Photo By Pavan Khengre)
-
विजयी होऊनही कार्यकर्ते निराश आहेत. त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, याची कबुली देतानाच, आगामी विधानसभा निवडणुकीतील विरोधकांच्या खोट्या राजकीय कथानकाला त्याच भाषेत उत्तर द्या, आदेशाची वाट पाहू नका, असा कानमंत्र फडणवीस आणि शहा यांनी दिला. (Express Photo By Pavan Khengre)
-
‘लोकसभा निवडणुकीतील खोट्या राजकीय कथानकातून शिकलो आहे, विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होणार नाही,’ असा विश्वास व्यक्त करून विधानसभा निवडणुकीची रणनीतीही स्पष्ट करण्यात आली. ‘आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा फडणवीस यांनी दिला. तर, ‘उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आणि खुनी आहेत,’ असा हल्लाबोल बावनकुळे आणि मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आशीष शेलार यांनी केला. (Express Photo By Pavan Khengre)
-
“महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब’ असून, त्याचे अध्यक्ष श्रीमान उद्धव ठाकरे आहेत”, अशी टीका अमित शाहा यांनी केली. तर “समाजात दुफळी वाढविण्याचे काम काही नेते करत आहेत. मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही, असे कोणी म्हटले होते?” असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. (Express Photo By Pavan Khengre)

LSG vs RCB: ऋषभ पंतने पंचांजवळ जाऊन ‘ते’ अपील नाकारत जिंकली मनं! जितेशने चालू सामन्यातच मारली मिठी; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?