-
आता देशाची राजधानी दिल्लीच्या पुढील आणि नवीन मुख्यमंत्री आतिशी मार्लेना असतील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक चेहरे पुढे येत होते पण त्यात सर्वात वरचे नाव होते ते आतिशी यांचे. (Photo: Atishi/FB)
-
आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जो एकमताने मान्य करण्यात आला. त्याच वेळी, आज संध्याकाळी अरविंद केजरीवालांनी एलजींना भेटून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत, आतिशी यांना मुख्यमंत्री म्हणून किती पगार मिळेल आणि भारतातील कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक पगार आहे ते जाणून घेऊया. (Photo: Atishi/FB)
-
भारतातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वेगवेगळे पगार मिळतात. प्रत्येक राज्यात मंत्र्यांचे वेतन वेगवेगळे असते. मुख्यमंत्र्यांचे वेतन भारताचे राष्ट्रपती ठरवतात आणि ते भारत सरकारच्या सचिवांना दिल्या जाणाऱ्या मासिक वेतनावर आधारीत असते. (Photo: Atishi/FB)
-
भारतातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिक पगाराच्या बाबतीत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा पगार १.७० लाख रुपये आहे आणि त्यासोबत अनेक भत्तेही मिळतात. (Photo: Atishi/FB)
-
भत्त्यांचा समावेश केल्यास दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन दरमहा ३ लाख ९० हजार रुपये होते. अशा परिस्थितीत आतिशी यांना आता दर महिन्याला हा पगार मिळणार आहे. (Photo: Atishi/FB)
-
तेलंगणा असे राज्य आहे ज्याच्या मुख्यमंत्र्यांना देशात सर्वाधिक पगार मिळतो. यासोबतच तेलंगणातील आमदारांनाही इतर राज्यांपेक्षा जास्त पगार मिळतो. (Photo: Anumula Revanth Reddy/FB)
-
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दर महिन्याला ४.२ लाख रुपये पगार मिळतो. (Photo: Anumula Revanth Reddy/FB)
-
तेलंगणामध्ये आमदारांना २.५० लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. यासोबतच त्यांना इतर अनेक भत्तेही मिळतात. (Photo: Anumula Revanth Reddy/FB)

पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टी प्रकरणातील अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”