-
शिवसेनेच्या ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बडगुजर यांना भाजपामध्ये आणण्यासाठी जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बरेच प्रयत्न केले.
-
महानगरपालिकेत वीज यंत्रणेशी संबंधित लहानसहान कामांचे ठेके घेणारे सुधाकर बडगुजर यांचा मागील काही वर्षांतील उत्कर्ष डोळे दिपवणारा आहे.
-
ठेकेदार साधारणत: भक्कम राजकीय सावलीखाली शासकीय दरवाजे स्वत:साठी खुले करून घेतात. या कौशल्यामुळे महापालिकेत सत्ता कुणाचीही असली तरी बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीची प्रगती वेगाने झाली.
-
सुधाकर बडगुजर महापालिकेत पहिल्यांदा २००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. नंतर शिवसेनेत प्रवेश करून व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर अल्पावधीत त्यांनी एकाच वेळी राजकीय व व्यावसायिक उत्कर्ष साधला.
-
महापालिकेतील म्युनिसिपल कामगार संघटनेचे प्रमुख म्हणून काम पाहत त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली. बनावट कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
-
शिवसेनेत प्रदीर्घ काळ काम करूनही पदाधिकाऱ्यांना जी महत्त्वाची पदे मिळाली नाही, ती बडगुजरांनी एकापाठोपाठ एक मिळवली होती. महापौर, विधानसभेची उमेदवारी त्यांना सहजपणे मिळाली.
-
खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पक्षाला, पक्षीय कार्यक्रमांना आर्थिक बळ देऊन कुठलीही गोष्ट अनुकूल करून घेण्यात ते वाकबगार आहेत असे शिवसैनिक सांगतात.
-
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा सहकारी असलेल्या सलीम कुत्ता याच्याबरोबर पार्टीमध्ये नृत्य केल्याप्रकरणी भाजपाने सुधाकर बडगुजर आणि शिवसेनेविरोधात रान उठवले होते. मात्र नाशिक मनपा निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी याच बडगुजर यांना आता भाजपात प्रवेश देण्यात आला आहे.
-
सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांच्या चित्रफिती सर्वांसमोर आणल्या होत्या. बडगुजर यांना देशद्रोही, समाजकंटक वगैरे बरीच विशेषणे थेट विधानसभेतही भाजपने लावली होती. मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक