-
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन वार्षिक फास्टॅग योजना जाहीर केली आहे. यामध्ये वाहनधारकांना तीन हजार रुपयांत वार्षिक फास्टॅग पास मिळणार आहे.
-
या पासद्वारे वाहनधारकांना वर्षभर किंवा २०० फेऱ्यांपर्यंत कोणताही टोल भरावा लागणार नाही. या योजनेचा लाभ फक्त कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी गैर-व्यावसायिक वाहनांना मिळणार आहे.
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दावा केला आहे की, या पासमुळे वाहनधारकांचे या पासमुळे किमान ७ हजार रुपये वाचणार आहेत. तसेच, टोल प्लाझावरून जाण्याचा सरासरी खर्च फक्त १५ रुपयांवर येईल.
-
दरम्यान, ही नवीन फास्टॅग वार्षिक योजना कोणत्याही वाहनधारकासाठी बंधनकारक नाही. ही फक्त एक पर्यायी योजना आहे, ज्यामुळे टोलवरील समस्या टाळण्यासाठी मदत होणार आहे.
-
वार्षिक फास्टॅग पासची किंमत किमान ३,००० रुपये आहे. याद्वारे वाहनधारकांना वर्षभर किंवा दोनशे फेऱ्यांपर्यंत टोल न भरता प्रवास करता येणार आहे.
-
हा पास फास्टॅग नोंदणीकृत असलेल्या विशिष्ट वाहनाशी जोडलेला असेल, त्यामुळे तो दुसऱ्या वाहनासाठी हस्तांतरित केला जाऊ शकणार नाही.
-
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, पासचे शुल्क दरवर्षी बदलले जाऊ शकते. हे बदल दरवर्षी १ एप्रिलपासून लागू होतील.
-
वाहनाची पात्रता आणि त्याच्याशी जोडलेल्या फास्टॅगची पडताळणी केल्यानंतरच नवीन वार्षिक पास मंजूर केला जाईल. पास मंजूर झाल्यानंतर, वाहनधारकाला ‘राजमार्ग यात्रा’ मोबाइल अॅप किंवा एनएचएआयच्या वेबसाइटद्वारे वर्ष २०२५-२०२६ साठी ३,००० रुपये भरून पास खरेदी करता येईल.
-
३ हजार रुपये शुल्क भरल्यानंतर, नोंदणीकृत फास्टॅगवर वार्षिक पास अॅक्टिव्हेट केला जाईल आणि वाहनधारकाला पासबद्दल एसएमएस अपडेट्स मिळतील. (सर्व फोटो सौजन्य: पीटीआय)

Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते…; पाहा, जपानी लोकांच्या प्रतिक्रिया