-
शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन केलं गेलं आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)
-
कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील आंदोलनात सहभागी झाले. (File photo)
-
‘कपाळाच्या कुंकूऐवढी जमीन सुद्धा मिळणार नाही’ असा संतापलेल्या महिलांचा सरकारला इशारा दिला आहे. दरम्यान, शक्तिपीठ महामार्गाचं सगळं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात.. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)
-
नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी रस्तेप्रकल्प आहे. परंतु या महामार्गाला राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे. (File photo)
-
हा शक्तीपीठ प्रकल्प ६ पदरी असणार आहे. तो वर्धा, नांदेड, परभणी, धाराशिव, यवतमाळ, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. (प्रतिनिधिक छायाचित्र)
-
या महामार्गावर २६ ठिकाणी इंटरचेंज असतील तर ४८ मोठे पूल, ३० बोगदे, ८ रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. (छायाचित्र -लोकसत्ता टीम)
-
शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई , तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी या तीन शक्तिपीठांना जोडणार आहे. तसेच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा महामार्ग जोडणार आहे. (छायाचित्र – लोकसत्ता टीम)
-
परंतू या महामार्गाला स्वत:च्या शेतजमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळतो आहे. त्याचविरोधात आज चक्काजाम आंदोलन पाहायला मिळालं. (image – pixabay/representational image)
-
. (PC : Raju Shetti/X) हेही पाहा- केंद्र सरकारनं मुलींसाठी आणलेली ‘नव्या’ योजना काय आहे? कसा करायचा अर्ज?

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान