-
पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर काल रात्रीच्या सुमारास सूरज शुक्ला या तरुणाने कोयत्याने वार केले होते. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
त्याचवेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेकही करण्यात आला. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घातला. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
महात्मा गांधींच्या पुतळा विटंबनेच्या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून सुरज शुक्ला या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
दरम्यान, यावेळी अरविंद शिंदे म्हणाले, मागील १२ वर्षांच्या कालावधीत भाजप सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
त्या बाबत सांगायचे झाल्यास काही दिवसापूर्वी भाजप राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनचे नामांतर करण्यात यावे, हे कशाचे उदाहरण आहे. – अरविंद शिंदे (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
यातून समाजात केवळ तेढ निर्माण करणे हाच उद्देश आहे. पण हा उद्देश देशातील जनता कधीही पूर्ण होऊ देणार नाही. पुणे स्टेशन नामांतराची चर्चा थांबत नाही तोवर काल रात्री भगवे वस्त्र परिधान करून सुरज शुक्ला या तरुणाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. – अरविंद शिंदे (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन)
-
या विटंबनाच्या घटनेमधून भाजप समाजाला काय संदेश देऊ पाहते, यामुळे आम्ही आज निषेध नोंदवित असून पुतळ्याला दुग्धभिषेक घातला आहे. पण या प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढील काळात अशा घटना होणार नाहीत, अशी आमची मागणी आहे. अरविंद शिंदे (एक्सप्रेस फोटो: अरुल होरायझन) हेही पाहा- सर्वोच्च न्यायालय ते ठाकरे बंधू; वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत आले आहेत निशिकांत दुबे

Amit Shah: अमित शाह राजकारणातील निवृत्तीनंतर काय करणार? म्हणाले, “वेद, उपनिषद आणि…”