-
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात (ISS) गेलेले पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून इतिहास घडवणारे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला बुधवारी (१६ जुलै) पृथ्वीवर परतले. १८ दिवस अंतराळात वैज्ञानिक प्रयोग केल्यानंतर अॅक्सिओम-४ मोहिमेच्या माध्यमातून परत आले आहेत.
-
पृथ्वीवर परतल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी पत्नी आणि मुलाला कडकडीत मिठी मारली. १८ दिवसांनी अंतराळातून परतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियाबरोबरचे हे भावनिक क्षण कॅमेऱ्याने टिपले आहेत.
-
इस्रो स्पेसफ्लाईट या एक्स अकाऊंटवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. शुंभाशू शुक्ला यांची पत्नी कामना आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा कियाश यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत.
-
या मोहिमेसाठी शुभांशू शुक्ला दोन महिने कुटुंबापासून दूर होते. प्रक्षेपणापूर्वी एक महिन्याहून अधिक काळ ते क्वारंटाइनमध्ये होते. तसेच प्रत्यक्ष मोहीम आणि त्यानंतरचा काळ असे मिळून ते दोन महिने या मोहिमेसाठी मेहनत घेत होते.
-
अंतराळातून परतलेल्या शुभांशू शुक्ला यांनी त्यांची पत्नी कामना आणि सहा वर्षांच्या मुलाला घट्ट मिठी मारली आहे. हे फोटो पाहून नेटिझन्सही त्यांची मोहीम, घरापासून दूर राहून त्यांनी अवकाश संशोधनात दिलेले योगदान याचे कौतुक करत आहेत.
-
१९८४ साली भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे अवकाशात गेले होते. त्यानंतर शुभांशू शुक्ला हे थेट आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर ठरले आहेत.
-
१८ दिवसांची मोहीम संपवून अॅक्सिओम ४ क्रूचे पायलट शुभांशू शुक्ला नियंत्रित स्प्लॅशडाउनमध्ये यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले. १५ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३५ वाजता सॅन दिएगोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात उतरले.
-
मानवी शरीरावर आणि वनस्पतींच्या विविध प्रजातींवर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम अभ्यासण्यासाठी शुक्ला यांनी अॅक्सिओम ४ टीमसोबत वैज्ञानिक प्रयोगांचे नेतृत्व केले.

Video: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच फ्री स्टाईल हाणामारी; आव्हाड यांनी केला गंभीर आरोप