-
Gaurav Gogoi Lok Sabha Speech : पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले. त्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तिथल्या तळांवर हवाई हल्ले केले. त्यामुळे भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं. मात्र, काही तासांत हे युद्ध थांबवण्यात आलं. या सर्व घटनांवर सरकारने जनतेला उत्तरं द्यावीत अशी मागणी विरोधकांनी केली होती. दरम्यान, सरकारने सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली असून आज लोकसभेत यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. (PC : Sansad TV)
-
काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, “सरकार जनतेपासून नेमकं काय लपवू पाहतंय? पहलगाममधील हल्ल्याचं सत्य, ऑपरेशन सिंदूरचं सत्य समोर आलं पाहिजे.”(PC : Sansad TV)
-
आसाममधील जोरहाटचे खासदार गोगोई म्हणाले, “संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत पहलगाम व ऑपरेशन सिंदूरबाबत बरीच माहिती दिली. मात्र, दहशतवादी नेमके कुठून व कसे आले ते अद्याप सांगितलेलं नाही. सरकारने जनतेला याचं उत्तर द्यावं.”(PC : Sansad TV)
-
पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांचं ध्येय काय होतं? काश्मिरच्या अर्थव्यवस्थेची हानी करणे, देशात धार्मिक तेढ निर्माण करणे ही त्यांची उद्दीष्ट्ये होती का? असा प्रश्न गोगोई यांनी उपस्थित केला.(PC : Sansad TV)
-
काँग्रेस नेते गोगोई म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्याला १०० दिवस झाले, पण पाचपैकी एकाही दहशतवाद्याला पकडलेलं नाही. दहशतवादी कुठे आहेत याबाबत सरकारकडे अद्याप उत्तर नाही.”(PC : Sansad TV)
-
काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, “जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर राज्यात पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळेल असं मोदी सरकारने म्हटलं होतं. त्यानंतर तिकडे पर्यटक जाऊ लागले. परंतु, दहशतवाद्यांनी पर्यटकांवरच हल्ला केला. हल्ल्यानंतर तिथे एका तासाने रुग्णवाहिका पोहोचली. त्यानंतर सरकारची सुरक्षा यंत्रणा दाखल झाली. ही स्थिती कधी बदलणार?”(PC : Sansad TV)
-
जोरहाटचे खासदार म्हणाले, “गृहमंत्री हल्ल्याची जबाबदारी घेणार का? सरकार सातत्याने लेफ्टनंट गव्हर्नरवर खापर फोडतंय, ते कधी थांबणार?” (PC : Sansad TV)
-
सरकारने हल्ल्याचं खापर पर्यटन कंपन्यांवरही फोडलं आहे. पर्यटन कंपन्यांनी नियम मोडून पर्यटकांना बैसरनमध्ये नेल्याचा सरकारचा दावा आहे. परंतु, कंपन्या पर्यटकांना तिथे नेत असताना, दुसऱ्या बाजूने तिथे दहशतवादी पोहोचत असताना सरकार व त्यांची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? असा प्रश्न गोगोई यांनी उपस्थित केला. (PC : Sansad TV)
-
“संरक्षण यंत्रणा व सरकारला वाटत असेल की आमच्याकडून कितीही मोठी चूक झाली तरी कोणीही त्यावर प्रश्न उपस्थित करणार नाहीत. मात्र, तसं होणार नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून प्रश्न उपस्थित करत राहणार आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील.” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारला धारेवर धरलं. (PC : Sansad TV)

“गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” अवघ्या ५ सेकंदात कार चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं? पाहा VIDEO