-
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमी आध्यात्माला महत्व दिलेलं आहे. त्यांनी सोमवारी त्रिपुरातील गोमती जिल्ह्यातील नूतनीकरण केलेल्या त्रिपुरेश्वरी मंदिरात प्रार्थना केली आहे. (Photo: Narendra Modi/X)
-
पंतप्रधान मोदी शारदिय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्रिपुरातल्या गोमती जिल्ह्यातील त्रिपुरेश्वरी मंदिरात पोहोचले. मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. (Photo: Narendra Modi/X)
-
पंतप्रधान मोदींनी यावेळी मंदिरात प्रार्थना केली. यावेळी त्रिपूराचे राज्यपाल एन. इंद्रसेना रेड्डी, मुख्यमंत्री माणिक साहा आणि अनेक सरकारी अधिकारी उपस्थित होते. (Photo: Narendra Modi/X)
-
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरेश्वरी मंदिरात पूजा केली आणि देशवासियांसाठी आशीर्वाद मागितले. (Photo: Narendra Modi/X)
-
त्रिपुरेश्वरी मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेअंतर्गत या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय. शारदीय नवरात्रीमध्ये येथे मोठे उत्सव आयोजित केले जातात. (Photo Source: X)
-
काय आहे योजना?
केंद्र सरकारची प्रसाद योजना (PRASAD Scheme) ही भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाची एक केंद्रीय योजना आहे. देशभरातील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची स्थळे विकसित करणे त्यातून पर्यटन वाढवणे व पर्यटकांना सोयी-सुविधा सुपूर्द करणे हा या योजनेचा उद्देश आहे. (Photo Source: X) -
दरम्यान, त्रिपुरेश्वरी मंदिराचा इतिहास ५०० वर्षांहून अधिक जुना असल्याचे मानले जाते. हे मंदिर १५०१ मध्ये महाराजा धन्य माणिक्य यांनी बांधले होते. (Photo Source: X)
-
दरम्यान, यावेळी पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिराबाहेर गर्दी केली होती. (Photo Source: X)
-
(Photo: Narendra Modi/X) हेही पाहा- आयफोन १७ भारतीयांनाच महाग! यूके, यूएसए ते जपान; जगातल्या १० देशांमध्ये त्याची किंमत किती? वाचा…

“नितीन गडकरींचा मुलगा दिवसाला १४४ कोटींनी श्रीमंत होतोय”, अंजली दमानियांनी मांडलं गणित; शेअर्सचे हे आकडे पाहिलेत का?