-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एबीपी वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
-
यावेळी त्यांना मुलाखतीच्या शेवटी रॅपिड फायर दरम्यान काही प्रश्न विचारण्यात आले. काही नेत्यांची नावे घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल एका शब्दात किंवा वाक्यात उत्तर देण्यास सांगितलं असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशी काही उत्तरं दिली, ज्याची चर्चा आता होत आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, शरद पवार, अरविंद केजरीवाल, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कुणाल कामराबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. यावरही त्यांनी मनमोकळी उत्तरं दिली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी – नवभारताचे निर्माता
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह – सरसेनापती
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प – गोंधळलेले व्यक्तीमत्व
-
मनोज जरांगे पाटील – त्यांनी इतकी उपोषणं केली आहेत की त्यांना आता उपोषण वीर म्हणायला हवं.
-
उद्धव ठाकरे – कभी हा, कभी ना
-
एकनाथ शिंदे – इमोशनल मित्र
-
अजित पवार – प्रॅक्टिकल मित्र
-
शरद पवार – शरद पवारांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस हिंदीत म्हणाले की, सुलझी हुई उलझन.
-
अरविंद केजरीवाल – कुठे आहेत ते?
-
कुणाल कामरा – कोण आहे तो?

प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?