-
व्हेनेझुएलाच्या जनतेच्या लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हुकूमशाहीतून लोकशाहीकडे न्याय्य आणि शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी केलेल्या संघर्षासाठी मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
-
मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांचे वडील हेन्रिक मचाडो हे एक उद्योगपती होते आणि आई कोरिना पॅरिस्का या मानसशास्त्रज्ञ होत्या. मारिया लहानपणापासूनच त्या स्पष्टवक्त्या आणि धाडसी आहेत.
-
मारिया कोरिना मचाडो यांनी आंद्रेस बेलो कॅथोलिक विद्यापीठातून औद्योगिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि नंतर आयईएसएमधून वित्त विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
-
मारिया यांनी चांगल्या पगाराची नोकरी करण्याऐवजी किंवा व्यवसायात कारकिर्द करण्याऐवजी, राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. कारण त्या व्हेनेझुएलाच्या बिघडत्या परिस्थितीमुळे त्रस्त होती.
-
२००२ मध्ये, मारिया कोरिना मचाडो यांनी सुमाते ही संघटना स्थापन केली जी निवडणुकांवर लक्ष ठेवते आणि नागरी हक्कांवर काम करते
-
. येथूनच त्यांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यांनी नंतर व्हेंटे व्हेनेझुएला हा राजकीय पक्ष स्थापन केला आणि देशातील बदलाचा आवाज बनल्या.
-
मारिया कोरिना यांना त्यांच्या स्पष्टवक्त्या वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेसाठी व्हेनेझुएलाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखले जाते.
-
मारिया कोरिना यांना माजी राष्ट्राध्यक्ष ह्यूगो चावेझ आणि सध्याचे नेते निकोलस मादुरो यांच्या हुकूमशाहीचा उघडपणे विरोध केला होता. त्यांना अनेकदा धमक्या आणि अटकेचा सामना करावा लागला, परंतु त्या कधीही मागे हटल्या नाहीत.
-
नोबेल समितीने त्यांना ‘लोकशाहीच्या लढाईत नैतिक धैर्य आणि धाडशी नेतृत्व’ यासाठी हा पुरस्कार दिला आहे. (All Photos: @MariaCorinaYA)

CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’