-
शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या. (सर्व फोटो सौजन्य-मेधा कुलकर्णी, एक्स पेज)
-
शनिवार वाडा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. १७३० मध्ये बाजीराव पेश्व्यांच्या काळात ही वास्तू बांधली गेली. या वाड्याला इतिहासात अनन्य साधारण महत्त्व आहे.
-
शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पतित पावन संघटनेने या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं. मेधा कुलकर्णी यांनी या आंदोलनाचं नेतृ्त्व केलं.
-
शनिवार वाड्यात जाण्यापासून सुरुवातीला मेधा कुलकर्णी आणि आंदोलकांना पोलिसांनी अडवलं होतं. पण नंतर त्यांना जाऊ दिलं.
-
शनिवार वाड्यात ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं तिथे गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्यात आली. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून ही जागा पवित्र केली.
-
तुम्हाला नमाज पठण करायचं असेल तर आमची ना नाही. पण शनिवार वाडा या किंवा अशा कुठल्याही ऐतिहासिक वास्तूमध्ये नमाज पठण करु नका. मशिदीत किंवा घरी जाऊन नमाज पठण करा असं मेधा कुलकर्णींनी म्हटलं आहे.
-
या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केले म्हणून भाजपावाल्यांनी गोमूत्र शिंपडले हे पाहून कपाळावर हात मारायची वेळ आली. अरे बाबांनो त्या शनिवार वाड्यात मस्तानीही राहिली आहे. पेशव्यांच्या सरदारांनीच छत्रपतींचा जरीपटका काढून युनियन जॅक फडकावला होता. अशा ठिकाणी विधात्याचे नाव त्या महिलांनी घेतले तर यांच्या पोटात दुखायला लागले. तुम्हाला तीथे जप करत बसायला कोणी अडवले आहे का?
-
समोर आणि बाजूला दर्गा आहे तो ही पेशवेकालीन! पेशव्यांना त्यांची अडचण नव्हती पण तुम्हाला असेल तर हवा त्या दर्ग्यांना शिवून येते म्हणून आपल्या नाकातही गोमूत्र घालणार का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसंच शनिवार वाड्यात मस्तानीही राहिली होती ही आठवणही त्यांनी करुन दिली.
रोहित शर्मा, कोहली पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं विधान; म्हणाले, “तर आश्चर्य वाटणार नाही…”