-
मराठवाडय़ासाठी पाणीटंचाई निर्माण झाली नाही तर आश्चर्य वाटावे, असे वातावरण गेली अनेक वर्षे आहे. त्यामुळे एक हजार टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तसा दर उन्हाळ्यातील नित्याची बाब झाली आहे. टंचाईच्या तीव्रतेची संवेदनाच हरवून बसावी, असे सध्याचे वातावरण आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
टंचाई उपाययोजना असा शब्द उच्चारला, तरी जलयुक्त शिवार असे एकच एक जालीम उत्तर प्रत्येकाला सांगितले जाते. या कार्यक्रमातून पाणलोटाची कामे कधी होणार, कधी त्या बंधाऱ्यात पाणी अडणार, या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातच आहेत. (छाया – मयूर बारगजे)
-
उन्हाचा तडाखा जसजसा वाढू लागला, तसतसे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट बिकट स्वरूप धारण करत आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
नाशिकमध्ये सद्य:स्थितीत जवळपास ३० गावे आणि १००हून अधिक वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्य़ात टँकर सुरू नसले तरी ग्रामीण भागांत पाण्यासाठी महिला-मुलांना पायपीट करावी लागत आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
कायमस्वरूपी उपाय केले जात नसल्याने शेकडो गावांना टँकरने पाणी पुरविणे हा एककलमी कार्यक्रम असतो. यंदाचा उन्हाळ्याचा हंगामही त्यास अपवाद ठरला नाही. (छाया – मयूर बारगजे)
-
अनेक गावांत महिला व मुलांची सकाळपासून पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू होते. धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्य़ांत अद्याप एकही टँकर सुरू करण्यात आलेला नाही. (छाया – मयूर बारगजे)
-
उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच नगर जिल्हा पाण्यासाठी तहानला आहे. आता दिवसागणिक ही व्याकूळता वाढते आहे. सध्या जिल्हय़ात १७८ गावे व तब्बल ७०० वाडय़ावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, त्यासाठी जिल्हाभर २४२ टँकर सुरू आहेत. (छाया – मयूर बारगजे)
-
मराठवाडय़ातील जायकवाडी धरण भरण्याच्या अट्टहासामुळे सिंचनाच्या क्षेत्रातही शेतीचे पाणी दूर राहिले, पिण्याच्या पाण्याची बोंब आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
नगर जिल्हय़ातील पारनेर, पाथर्डी, शेवगाव, नगर, जामखेड, श्रीगोंदे, कर्जत, राहाता, नेवासे आणि संगमनेर या दहा तालुक्यांमध्ये पाण्याची स्थिती विदारक आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
एकीकडे डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या महिला आणि दुसरीकडे वाहनांवर नळ सोडणारे नागरिक, हे विरोधाभासी चित्र आता उन्हाची चाहूल लागताच आणखी ठळक होऊ लागले आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण, तर शहरी भागात पाण्याची उधळण, ही अवस्था विदर्भात सर्वदूर आहे. पूर्वच्या तुलनेत पश्चिम विदर्भ नेहमीच तहानलेला असतो. (छाया – मयूर बारगजे)
-
उंचीवर असलेला बुलढाणा जिल्हा, वाशीम व अकोला शहरांत कायम पाणीटंचाई असते. यंदाही त्याची तीव्रता कायम आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
योजना तयार केली, पण पाणी स्रोताकडे लक्ष दिले नाही. परिणामी, ही गावे तहानलेली आहेत. यंदा सतत अवकाळी पाऊस झाल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी थोडी बरी आहे. (छाया – मयूर बारगजे)
-
मागास, अशी ओळख असलेल्या मेळघाटात फिरले की, डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करणाऱ्या महिलांची रांग प्रत्येक गावात दिसते. संपूर्ण विभागात दोनशे गावे अशी आहेत जेथे नळयोजना आहेत, पण पाण्याचाच पत्ता नाही. (छाया – मयूर बारगजे)

Uddhav Thackeray : ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे हे मान्य आहे का?’ उद्धव ठाकरे म्हणाले, “मी…”