-
आपल्या अभिनयाने आणि बोल्ड इमेजने जुन्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीचा काळ गाजविणाऱ्या डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस आहे.
-
स्वत:च्या आकर्षक आणि कमनीय बांध्यासाठी प्रसिद्ध असलेली शिल्पा शेट्टी बॉलीवूडमध्ये नेहमीच चर्चेत राहिली आहे. ‘रिश्ते’, ‘फिर मिलेंगे’ या चित्रपटांतील अभिनयाने तिने बॉलीवूडला आपली दखल घेण्यास भाग पाडले.
-
सुनंदा आणि सुरेंद्र शेट्टी यांची कन्या असलेल्या शिल्पाने ‘बाजीगर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली. ‘आग’ या चित्रपटात तिने पहिल्यांदा मुख्य नायिकेची भूमिका साकारली.
-
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या डिंपल कपाडिया यांच्यातील अभिनय गुण राज कपूर यांनी हेरले. त्यांनी डिंपलला वयाच्या १३व्या वर्षीच ‘बॉबी’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता.
-
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांचे प्रेमकरण बॉलीवूडमध्ये प्रचंड गाजले होते.
-
‘बॉबी’ या चित्रपटानंतर ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्यातील प्रेमकहाणीचे अनेक किस्से हिंदी चित्रपटसृष्टीत ऐकवले जाऊ लागले होते. मात्र, राज कपूर यांना हे प्रेमप्रकरण पसंत नव्हते. त्यानंतर, डिंपलने अचानकपणे राजेश खन्ना यांच्याशी लग्न करून या अफवांना पूर्णविराम दिला होता. लग्नानंतर डिंपलने हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. त्यावेळी अभिनेता सनी देओल आणि डिंपल यांचे प्रेमप्रकरणही चांगलेच गाजले होते.
-
डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांच्यात तब्बल १५ वर्षांचे अंतर होते. डिंपल स्वत: राजेश खन्ना यांची चाहती होती. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी मागणी घातल्यानंतर तिने लगेचच होकार दिला. लग्नाच्यावेळी डिंपल कपाडिया अवघ्या १७ वर्षांची होती.
-
अभिनेत्री म्हणून कारकीर्द संपुष्टात येत असतानाच राज कुंद्रा या उद्योजकाशी लग्न करून राजस्थान रॉयल्सची मालकीण झालेल्या शिल्पा सध्या मातृत्वाची जबाबदारी सांभाळण्यात व्यग्र आहे.
-
दीर्घकाळ राखलेल्या उत्तम फिटनेसमुळे शिल्पा शेट्टी अजूनपर्यंतही फॅशन जगतात नावाजली जाते.
-
-
-
-
-
-
-
-
-
-

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल